Coronavirus: माजी एशियन गेम्स सुवर्ण पदक विजेता बॉक्सर Dingko Singh कोरोना पॉसिटीव्ह, कॅन्सरवर उपचारासाठी दिल्लीला पोहचले होते
यामुळे त्यांच्या आरोग्यासंबंधी चिंता अजून वाढली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 41 वर्षीय बॉक्सरला रेडिएशन थेरपीसाठी दिल्ली येथे आणण्यात आले होते.
एशियन गेम्सचे सुवर्णपदक विजेता माजी बॉक्सर आणि यकृत कॅन्सरशी झुंज देणारे डिंगको सिंह (Dingko Singh) यांची कोविड-19 (COVID-19) चाचणी सकारात्मक आली आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यासंबंधी चिंता अजून वाढली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 41 वर्षीय बॉक्सरला रेडिएशन थेरपीसाठी दिल्ली (Delhi) येथे आणण्यात आले होते. पण पुन्हा कावीळ झाल्यामुळे त्यांना त्याच्या मणिपूरला पाठवण्यात आले. जेव्हा त्यांनी दिल्ली सोडली तेव्हा त्यांची टेस्ट नकारात्मक होता परंतु मणिपूर येथे गेल्यानंतर ते सकारात्मक आढळले. रविवारी मणिपूर सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, राज्यात कोविड-19 चे पाच नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यातील एक इम्फाल पूर्वेची आहे जेथे बॉक्सर राहत आहे. राज्य सरकार कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची नावे उघड करीत नाही. राज्य सरकार म्हणाली, 'त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रिहम्समधील रीजनल केअर इन्स्टिट्यूट (इंफाळ येथील रीजनल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) येथे वर्ग करण्यात येईल.' (कोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यामागची चीनची मूळ योजना हरभजन सिंह याने केली उघकीस, ट्विटवरून लगावली फटकार)
यकृताच्या कर्करोगाच्या उपचारा दरम्यान 41 वर्षीय डिंगकोवर मार्चमध्ये दिल्लीच्या लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस (आयएलबीएस) च्या केमोथेरपी सत्रासाठी ते नियोजित होते परंतु देशव्यापी लॉकडाउनमुळे ते इम्फालहून राजधानीला जाऊ शकले नाहीत. त्यानंतर बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने (बीएफआय) 26 एप्रिलला डिंगको आणि त्यांच्या पत्नीला स्पाइसजेट एअर रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीत आणले आणि त्यांना आयएलबीएसमध्ये दाखल केले. ट्रॅव्हल प्रोटोकॉलप्रमाणे या जोडप्याची कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती आणि मणिपूरला उड्डाण घेण्याच्या एक दिवस आधी दोन्ही निकाल नकारात्मक आले होते.
डिंगको यांना प्रथमच 2016 मध्ये कर्करोगाचे निदान झाले होते. 1998 वर्षी बँकॉकमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 16 व्या वर्षी क्रीडा स्पर्धेत भारताचे पहिले बॉक्सिंग सुवर्णपदक जिंकले. त्यांना 1998 मध्ये अर्जुन पुरस्कार आणि 2013 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.