Women Maharashtra Kesari 2023: पहिली महिला केसरी कुस्ती स्पर्धा, सांगली येथे आजपासून रंगणार थरार; क्रीडा वर्तुळात उत्सुकता शिगेला
दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 50 , 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
राज्यातील महिला कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाचा पहिला बहुमान हा सांगली शहराला मिळाला आहे. या स्पर्धेच्या विजेतेपदाचा पहिला बहुमान मिळवण्यासाठी राज्यातील महिला कुस्तीपटू जोरदार मेहनत घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दहा वजनी गटासह खुल्या गटांतील कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. (Mahim Mazar Encroachment Case: माहीम मजार अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेचा हातोडा, अतिक्रमण हटवले; राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर कारवाई )
सांगलीत आजपासून पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 50 , 53, 55, 57, 59, 62, 68, 72 आणि 76 वजनी गटात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. महाराष्ट्र केसरीसाठी 65 वजनी गटावरील महिला मल्ल किताबासाठी लढणार आहेत. या स्पर्धेत 45 जिल्ह्याचे संघ सहभागी होणार आहेत. यावेळी महत्त्वाचा बद्दल म्हणजे या सर्व स्पर्धा या मॅट वरच खेळवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरीला स्पर्धेला 1961 साली सुरुवात झाली तेव्हापासून महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला चांदीची गदा ही देण्यात येते. म्हणून या चादींच्या गदेला महाराष्ट्रात मान असून त्याला मोठा ऐतिहासिक वारसा देखील आहे. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली. पुण्यात यंदा 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुण्याचा पैलवान शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर मात करत मानाची गदा जिंकली होती.