FIFA World Cup 2022 Final Prize Money: चॅम्पियन अर्जेंटिनाला सोन्याच्या ट्रॉफीसह अब्जावधींची मिळाली रक्कम, फ्रान्सवरही पडला पैशांचा पाऊस

चॅम्पियन अर्जेंटिनाने 18 कॅरेट सोन्याची चमकणारी ट्रॉफी आणि $ 42 दशलक्ष म्हणजे सुमारे 347 कोटी रुपये जिंकले आहेत. तसेच फायनलमध्ये पराभूत झालेल्या फ्रेंच संघावर पैशांचा पाऊस पडला आणि या संघाला 30 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 248 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.

FIFA World Cup 2022 Final Prize Money: चॅम्पियन अर्जेंटिनाला सोन्याच्या ट्रॉफीसह अब्जावधींची मिळाली रक्कम, फ्रान्सवरही पडला पैशांचा पाऊस
FIFA World Cup 2022 Awards (Photo Credit - Twitter)

FIFA World Cup 2022 Final Prize Money: फिफा विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) नेतृत्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने गतविजेत्या फ्रान्सचा (ARG vs FRA) पराभव केला आहे. यासह अर्जेंटिनाच्या संघाने 36 वर्षांनंतर फिफा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला आहे. चॅम्पियन अर्जेंटिनाने 18 कॅरेट सोन्याची चमकणारी ट्रॉफी आणि $ 42 दशलक्ष म्हणजे सुमारे 347 कोटी रुपये जिंकले आहेत. तसेच फायनलमध्ये पराभूत झालेल्या फ्रेंच संघावर पैशांचा पाऊस पडला आणि या संघाला 30 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 248 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या क्रोएशिया संघाला जवळपास 223 कोटी रुपये मिळाले आहेत. (हे देखील वाचा: FIFA World Cup 2022 Awards List: विश्वचषकानंतर 'या' खेळाडूंना मिळाले 'हे' पुरस्कार, संपूर्ण पुरस्कार यादी पहा येथे)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 10:35 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).