FIFA 2021 U-17 Women's World Cup: भारतात होणारी अंडर-17 महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा रद्द, FIFA कडून 2022 स्पर्धेचे यमजानपद बहाल
म्हणजेच आता भारत 2022 फिफा अंडर-17 महिला विश्वचषक आणि कोस्टा रिका 2022 अंडर -20 महिला विश्वचषकचे आयोजन करेल.
FIFA 2021 U-17 Women's World Cup: जागतिक फुटबॉल शासित मंडळ, फिफाने (FIFA) भारतात 2020 मध्ये होणाऱ्या अंडर-17 महिला (U-17 Womens' World Cup) स्पर्धा रद्द करण्याची घोषणा केली आणि देशाला 2022 आवृत्तीचे यजमानपद बहाल केले. म्हणजेच आता भारत (India) 2022 फिफा अंडर-17 महिला विश्वचषक आणि कोस्टा रिका (Costa Rica) 2022 अंडर -20 महिला विश्वचषकचे आयोजन करेल. “याचा परिणाम म्हणून आणि भागधारकांकडून मिळालेल्या फीडबॅकचा काळजीपूर्वक विचार काळजीपूर्वक विचार केल्यानंतर फिफा-कन्फेडरेशन्स कोविड वर्किंग ग्रुपने दोन महिला युथ टूर्नामेंट्स आवृत्ती रद्द कराव्यात आणि 2020 स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांना 2022 स्पर्धेचे यजमानपद दिले जाईल,” फिफाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात स्पष्ट केले. भारताने यापूर्वी, 2017 मध्ये अंडर-17 महिला फुटबॉल विश्वचषकचे आयोजन केले आहेत. आणि पुढील वर्षी होणाऱ्या या साठी पाच ठिकाणांची निवड करण्यात आली होती. नवी मुंबई, भुवनेश्वर, कोलकाता, गुवाहाटी, अहमदाबाद येथे ही स्पर्धा 2021मध्ये खेळण्यात आयोजित केली जाणार होती. (Equal Pay for Brazil Men-Women Footballers: ब्राझील सरकारचा क्रांतीकारी निर्णय, महिला आणि पुरुष फुटबॉल संघाला मिळणार समान वेतन)
यापूर्वी या महिन्यात, नोव्हेंबर महिन्यात आयोजित होणारी ही स्पर्धा कोरोना व्हायरसमुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दरम्यान, 17फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत निश्चित केलेल्या तारखांमुळे फिफाने वयाचा निकष शिथिल केला असल्याने सध्याच्या खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. फिफा कौन्सिलच्या ब्युरोने हा निर्णय सध्याच्या जागतिक कोविड महामारीचा अभ्यास करून आणि फुटबॉलवर त्याचा सतत होणारा परिणाम यांचा आढावा घेऊन घेतला आहे. "फिफा आणि संबंधित होस्ट सदस्य संघटनांमधील स्पर्धेच्या 2022 आवृत्तीविषयी पुढील सल्लामसलत केल्यानंतर, ब्यूरो ऑफ कौन्सिलने फिफा अंडर -20 महिला विश्वचषक 2022 चे यजमान म्हणून कोस्टा रिका आणि फिफा अंडर 17 महिला विश्वचषक 2022 चे यजमान म्हणून भारताला मान्यता दिली आहे."
दुसरीकडे, फिफा क्लब वर्ल्ड कप कतर 2020, जो मूळत: डिसेंबर महिन्यात आयोजित होणार होते, ते 2021 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. फिफा कौन्सिलने जून 2019 मध्ये मूळ यजमान नियुक्तीनुसार आता ही स्पर्धा कतार येथे 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.