Coronavirus Pandemic: 124 वर्षांत चौथ्यांदा ऑलिम्पिक होणार रद्द? यापूर्वी 'या' कारणांमुळे रद्द करण्यात आला होता कार्यक्रम
जपानने 1940 मध्ये ग्रीष्म आणि हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची योजना केली होती, परंतु दुसर्या महायुद्धामुळे खेळ रद्द झाले होते. यंदाचा कार्यक्रम रद्द झाल्यास 124 वर्षात चौथ्यांदा अशी घटना घडेल.
कोरोना व्हायरसचा (Coronavirus) परिणाम जवळजवळ प्रत्येक खेळावर परिणाम झाला आहे आणि त्यामुळे एकतर मालिका स्थगित किंवा रद्द करण्यात आली आहे. या प्राणघातक कोरोना व्हायरसने जगभरात 7,000 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे, अशा स्थितीत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि टोकियो संयोजक त्याच्या निर्धारित तारखेला हे खेळ आयोजित करण्यास टाळाटाळ करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान शिंजो अबे (Shinzo Abe) म्हणाला की, "देश संक्रमणाच्या प्रसारावर मात करेल आणि योजनेनुसार ऑलिम्पिकचे आयोजन करेल." या सर्वांच्या दरम्यान, जपान ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो तशिमा यांना कोरोना व्हायरससाठी सकारात्मक चाचणी झाल्याचं समोर आलं आहे. तथापि, खेळांचे आयोजन करण्याबद्दल जपानच्या मतांवर याचा परिणाम झाला नाही. टोकियो ऑलिम्पिकच्या (Tokyo Olympics) आयोजनावर लटकटी तलवर असताना जपानचे उपपंतप्रधान तारो असो यांनी गेम्सला “शापित” म्हटले आणि ते पुढे म्हणाले की, दर 40 वर्षांनी ही समस्या उद्भवते."
यापूर्वी, जपानने 1940 मध्ये ग्रीष्म आणि हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करण्याची योजना केली होती, परंतु दुसर्या महायुद्धामुळे खेळ रद्द झाले होते. तथापि, ऑलिंपिकचा बाह्य घटकांमुळे परिणाम होण्याची ही पहिली वेळ नाही. यंदाचा कार्यक्रम रद्द झाल्यास 124 वर्षात चौथ्यांदा अशी घटना घडेल. 1916 मध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक जे बर्लिन आणि जर्मनमध्ये होणार होते परंतु पहिल्या महायुद्धामुळे रद्द करण्यात आले. 6 एप्रिल 1896 रोजी ऑलिंपिकची सुरुवात झाली. 1940 मध्ये टोकियो गेम्सचा त्याग केल्यानंतर, दुसर्या महायुद्धामुळे लंडनमधील 1944 ची आवृत्तीही रद्द झाली. शिवाय 1980 मध्ये सोव्हिएत युनियनच्या अफगाणिस्तानावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अमेरिका, चीन आणि जपानसह बर्याच देशांनी मॉस्को ऑलिम्पिकवर बहिष्कार घातला होता. तथापि, आयओसी ठरल्याप्रमाणे टोकियो गेम्स आयोजित करण्यावर ठाम आहे. (Tokyo 2020: कोरोनाव्हायरसच्या उद्रेक दरम्यान सूर्य किरणांनी पेटली टोकियो ऑलिम्पिकची मशाल, Video पाहून व्हाल थक्क)
आयओसीनेही मंगळवारी एक निवेदन जारी केले आहे आणि म्हटले आहे की, "आयओसीटोकियो ऑलिम्पिक खेळ 2020 साठी पूर्णपणे वचनबद्ध आहे, आणि चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी राहिल्याने या टप्प्यावर कठोर निर्णय घेण्याची गरज नाही; आणि या क्षणी कोणतीही अटकळ प्रतिकारक्षम असेल." कोविड-19 च्या उद्रेकाचा परिणाम यूरो 2020, कोपा अमेरिका आणि प्रीमियर लीग यासह अनेक प्रमुख कार्यक्रमांच्या मालिकांवर झाला आहे. शिवाय, व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरपर्यंत फ्रेंच ओपनटेनिस स्पर्धेलाही ढकलले गेले आहे. असे असूनही ऑलिम्पिक मंडळाने कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलण्याच्या पर्यायावर सार्वजनिकपणे विचार करण्यास नकार दिला आहे.