'एकत्र या आणि कठीण परिस्थितीवर मात करा', COVID-19 च्या पार्श्वभूमीवर सुनील छेत्री ने केले महत्वपूर्ण आवाहन

छेत्रीने करोनाशी लढा देताना, एकत्र या आणि सध्याच्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहन केले आहे.

सुनील छेत्री (Photo Credit: IANS)

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री (Sunil Chhetri) एशियन फुटबॉल संघ (Asian Football Confederation) च्या कोविड-19 (COVID-19) साथीच्या विरूद्ध लढाचा एक भाग बनला आहे. या आव्हानात्मक काळाला सामोरे जाण्यासाठी लोकांना शक्य ते सर्व करण्याची विनंती त्याने केली. छेत्रीने करोनाशी लढा देताना, एकत्र या आणि सध्याच्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहन केले आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार बाईचुंग भूटियासह कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी 'ब्रेक द चेन' नावाची मोहीम या आठवड्यात सुरू करण्यात आली. यात छेत्रीही सहभागी झाला. या मोहिमेमध्ये त्यांच्याशिवाय चीन फुटबॉल असोसिएशनचे (CFA) उपाध्यक्ष उपाध्यक्षा तसेच महान महिला फुटबॉलपटू सन वेन तसेच म्यानमार संघाचा कर्णधार क्याव झिन थेन यांचाही सहभाग होता. करोनासारख्या गंभीर विषाणू संसर्गावर कशी मात करता येईल, हे त्यात सांगण्यात आले आहे. (कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी 15 वर्षीय शूटर ईशा सिंह ची मदत, बचतीमधून PM-Cares फंडला 30 हजार रुपये केले दान)

गुरुवारपासून या अभियानाला सुरुवात झाली असून आजवर आशियातील 50 हुन अधिक फुटबॉलपटूंनी तसेच अधिकाऱ्यांनी या मोहिमेला पाठिंबा दर्शवला आहे. लोकांनी स्वत:च्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची, हे जागतिक आरोग्य संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) सल्ल्याने सांगण्यात आले असून या कठीण परिस्थितीत सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे एएफसीकडून सांगण्यात आले.

छेत्री म्हणाले, “प्रत्येकजण या कठीण काळातून जात आहे. जागतिक आरोग्य संस्था आणि आपल्या स्थानिक सरकारने दिलेल्या सल्ल्याचे अनुसरण करण्याची विनंती मी करतो. आपले योगदान देण्यासाठी आपण स्वच्छता राखणे आणि घरी राहण्याची आपली जबाबदारी आहे.” छेत्रीऐवजी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी आपापल्यापरीने लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहे. शिवाय, काहींनी सरकार आणि रुग्णांना मदत म्हणून कोटी रुपये दिले, तर काहींनी वैद्यकीय उपकरणं पुरवली आहेत. या महामारीचा सामना करण्यासाठी फिफाच्या या मोहिमेसाठी सोमवारी छेत्रीचा भूतकाळातील आणि सध्याच्या 28 स्टार्समध्ये निवडण्यात आले. सध्याच्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरसमुळे जगात जवळजवळ 30,000 मृत्यू तर सहा लाखाहून अधिक लोकं संक्रमित झाले आहेत.