Coronavirus: 21 वर्षीय स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रांसिस्को गार्सिया बनला कोरोनाचा शिकार, चाहत्यांसाठी मोठा धक्का
मालागाच्या क्लब अॅटलेटिको पोर्टाडा अल्टाच्या कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो फक्त 21 वर्षांचा होता.
कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) गभर खळबळ उडाली आहे. जवळजवळ सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. या प्राणघातक विषाणूमुळे जगभरात मृत्यूची संख्या 7000 ओलांडली आहे.चीनसह आशिया खंडानंतर कोरोनामुळे युरोपमध्ये सर्वाधिक विनाश पसरवत आहे. गेल्या 24 तासांत 349 स्पेनमध्ये 100 जण या विषाणूमुळे मरण पावले आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे एका तरूण फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू झाल्याची बातमीही समोर आली आहे. मालागाच्या क्लब अॅटलेटिको पोर्टाडा अल्टाच्या (Atletico Cotada Alta) कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचा (Francisco Garcia) कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला. तो फक्त 21 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर कर्करोगाचा उपचारही सुरू होता. या दरम्यान त्याला कोरोना व्हायरसचीही लागण झाली ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. युवा गार्सियाचा मृत्यू क्लब आणि त्याच्या चाहत्यांसाठी मोठी धक्कादायक बातमी आहे. (Coronavirus: कोरोना व्हायरसमुळे बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद जर्मनीत अडकला; महिना अखेरपर्यंत भारतात परतता येणार नाही)
फ्रान्सिस्को गार्सिया हा मालागामधील विषाणूमुळे प्राण गमावले सर्वत कमी वयाचा व्यक्ती आहे. युवा प्रशिक्षकाच्या मृत्यूबद्दल अॅटलेटिको पोर्टाडा अल्ता यांनी सोशल मीडियावर एक भावनिक निवेदन प्रसिद्ध केले आणि लिहिले: "अॅटलेटिको कोटाडा अल्ता कडून आम्हाला दुर्दैवाने, आज, सोडून गेलेले कोच फ्रान्सिस्को गार्सिया यांचे कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करू इच्छितो." "आणि आता फ्रान्सिस आम्ही तुझ्याशिवाय काय करू? जेव्हा आवश्यक असेल तर नेहमीच आमच्याबरोबर असायचा, आम्हाला मदत करायचा. आपण लीगमध्ये विजय मिळविणे कसे सुरू ठेवणार आहोत? आम्हाला कसे माहित नाही, परंतु आपल्यासाठी आम्ही नक्कीच करू. आम्ही तुम्हाला विसरणार नाही, शांततेत विश्रांती घ्या, कायमचे."
फुटबॉल क्लबने सांगितले की, त्यांच्या कनिष्ठ संघाचे प्रशिक्षक फ्रान्सिस्को गार्सियाचे रुग्णालयात निधन झाले. रविवारी गार्सियाला रुग्णालयात दाखल केले असता, त्याला कोरोना विषाणूची लक्षणे आढळली. नंतर त्यालाही कर्करोग असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. काही काळानंतर, गार्सियाचा मृत्यू झाला. जगातील 141 देशावर कोरोनाचा परिणाम जाणवत आहे. मोठ्या खेळाचे कार्यक्रम रद्द केले गेले आहे, तर काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.