BWF World Tour Finals: गतविजेता पीव्ही सिंधू चा वर्ल्ड टूर फायनलच्या पहिल्या सामन्यात गारद, जपानच्या यामागुचीविरुद्ध सलग तिसऱ्यांदा पराभूत

बुधवारी झालेल्या या सामन्यात सिंधूचा जपानच्या अकाने यामागुची हिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले.

पीव्ही सिंधू (Photo by Robertus Pudyanto/Getty Images)

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या भारताच्या स्टार शटलर पीव्ही सिंधू (PV Sindhu) हीच बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरच्या (BEWF World Tour) महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभव झाला. बुधवारी झालेल्या या सामन्यात सिंधूचा जपानच्या अकाने यामागुची (Akane Yamaguchi) हिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. सिंधूने पहिला गेम जिंकला. पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात करणाऱ्या सिंधूने पुढचे दोन गेम गमावले आणि जपानी खेळाडूने 18-21, 21-18, 21-8 अशी मात केली. जपानी खेळाडू यामागुचीने 68 मिनिटांत हा सामना जिंकला. यामागुचीविरुद्ध सिंधूचा हा सातवा पराभव आहे, तर 10 वेळा सिंधूला तिच्याविरुद्ध विजय मिळवण्यात यश आले आहे. यापूर्वी सिंधूचा यमागुचीविरुद्ध 10-6 असा रेकॉर्ड नोंदविला होता पण शेवटच्या दोन सामन्यांत तिला पराभव पत्करावा लागला होता.

सिंधूचा सामना आता अ गटातील दुसर्‍या सामन्यात चीनच्या चेन युफेईशी होईल. तिच्याविरूद्ध सिंधूचा 6. 3 रेकॉर्ड परंतु यावर्षी चेनने ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपसह सर्व 6 अंतिम सामने जिंकले आहेत. पहिल्या हाफमध्ये सिंधूने बराच संतुलित खेळ केला पण यमागुचीने पटकन तिच्यावर दबाव आणला. यानंतर सिंधूने बर्‍याच चुका केल्या. एका वेळी स्कोअर 7-7 होता आणि सिंधूने नंतर सहा गुणांची आघाडी वाढविली पण यामागुचीने स्कोअर 18-18 ने बरोबरी साधली. सिंधूने क्रॉस कोर्ट रिटर्नने पहिला गेम जिंकला. दुसर्‍या गेममध्येही या दोघांच्या लांब रॅली पाहायला मिळाल्या. दुसऱ्या गेममध्ये सिंधूकडे एकेकाळी 11-6 अशी आघाडी होती, पण ब्रेकनंतर यमागुचीने आक्रमक खेळात करत 15-15 ने बरोबरी केली. त्यानंतर यामागूचीने तिला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. तिसर्‍या गेममध्येही तिने ही लय कायम राखली आणि सिंधूच्या चुकांचा पुरेपूर फायदा घेत तिने खेळ आणि सामना जिंकला.

सिंधूने ऑगस्टमध्ये बासेलमध्ये आयोजित विश्वविजेतेपद जिंकले होते, परंतु त्यानंतर तिचा खराब फॉर्म कायम चालला आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने जुलैमध्ये इंडोनेशिया ओपन सुपर 750 स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यानंतर कोरिया ओपन आणि फुझौ ओपनच्या पहिल्या फेरीत तर चायना ओपन, डेन्मार्क ओपन आणि हाँगकाँग ओपनच्या दुसर्‍या फेरीत त्यांचा पराभव झाला.