BWF World Tour Finals 2019: दुसर्या सामन्यातही पीव्ही सिंधू पराभूत, बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्सचे आव्हान जवळपास संपुष्टात
वर्ल्ड टूर फायनल्समधील सिंधूचा हा सलग दुसरा पराभव आहे. यामुळे, आता सेमीफायनल गाठणे सिंधूसाठी कठीण झाले आहे. सिंधूला गुरुवारी चीनच्या चेन युफेई कडून पराभवाचा सामना करावा लागला.
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स (BWF World Tour Finals) च्या ग्रुप-अ च्या दुसर्या सामन्यात भारताची विद्यमान विजेती पीव्ही सिंधू (PV Sindhu) हिला पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड टूर फायनल्समधील सिंधूचा हा सलग दुसरा पराभव आहे. यामुळे, आता सेमीफायनल गाठणे सिंधूसाठी कठीण झाले आहे. सिंधूला गुरुवारी चीनच्या चेन युफेई (Chen Yu Fei) कडून पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्या मॅचमध्ये सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीने (Akane Yamaguchi) पराभूत केले होते. दुसर्या सामन्यात चिनी खेळाडूने सिंधूचा 20-22, 21-16, 21-12 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये फेये 9-6 आणि त्यानंतर 17-12 अशी होती. यानंतर सिंधूने चांगले पुनरागमन करत स्कोअर 17-18 वर आणला, पण चिनी खेळाडूने पुन्हा ही स्कोर 20-17 पर्यंत नेला. इथून सिंधूने सलग तीन गुणांसह 20-20 अशी बरोबरी साधली. यानंतर ऑलिम्पिक पदकविजेती सिंधूने तिच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठविला आणि पहिल्या सलग दोन गुणांसह पहिला सेट 22-20 च्या थरारक खेळीसह जिंकला.
दुसर्या गेममध्ये सिंधूने 4-1अशी आघाडी घेतली होती, पण चायनीज खेळाडूने पुनरागमन करत स्कोअर 4-4 च्या बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही खेळाडू पुन्हा 7-7 अशी बरोबरीत आले. चिनी खेळाडूने ब्रेकपर्यंत 11-7 अशी आघाडी घेतली. यानंतर, एकेवेळी 20-14 च्या चिनी खेळाडू पुढे होती आणि त्यानंतर सलग गुण मिळवत तिने 21-16 असा दुसरा गेम जिंकला आणि सामना तिसर्या गेमपर्यंत पोहोचवला. तिसर्या आणि निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंनी जोरदार खेळ सुरू केला. परिणामी एकावेळी सामना 10-10 च्या बरोबरीत आला. पण, चिनी खेळाडूने इथून सिंधूला आघाडी घेऊ दिली नाही आणि गेम जिंकत सामना जिंकला.
सिंधूविरुद्ध फेईचा हा चौथा विजय आहे, तर सिंधूने फेईविरुद्ध सहा वेळा विजय मिळविला आहे. अ गटातील आपला पहिला सामना गमावल्यानंतर सिंधूची सेमीफायनलची अवस्था आता अवघड झाली आहे. तिला आता तिच्या गटात फक्त एकच सामना खेळायचा आहे जो शुक्रवारी ती चीनच्या हे बिंगजियाओविरुद्ध खेळेल. दरम्यान, सिंधूने तिच्या मागील वर्ल्ड टूर फायनल्समध्ये एकही सामना गमावला नव्हता आणि अखेरीस जेतेपद जिंकले होते.