Australian Open 2021: नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी यांच्यात रंगणार ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅमची किताबी लढत

वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनल फेरीत ओसाकाने अमेरिकन अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा 6-3, 6-4 असा पराभव केला आणि आता शनिवार, 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिलांच्या अंतिम सामन्यात अमेरिकेची 22वी मानांकित जेनिफर ब्रॅडीशी किताबी लढत होईल.

नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी (Photo Credit: Facebook)

जपानची स्टार महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने (Naomi Osaka) ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम (Australia Open Final) फेरीत स्थान निश्चित केले. वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनल फेरीत ओसाकाने अमेरिकन अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्सचा (Serena Williams) 6-3, 6-4 असा पराभव केला आणि आता शनिवार, 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महिलांच्या अंतिम सामन्यात अमेरिकेची 22वी मानांकित जेनिफर ब्रॅडीशी (Jennifer Brady) किताबी लढत होईल. या पराभवामुळे सेरेनाचे 24 वे महिला एकेरी ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न आणखी लांबणीवर गेले. मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात सेरेनाने दुसर्‍या मानांकित सिमोना हलेपचा 6-3, 6-3 ने पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. ओसाकाने सरळ सेटमध्ये विजय मिळवत सेमीफायनलयामध्ये प्रवेश केला होता. एक तास आणि सहा मिनिटे चाललेल्या सामन्यात ओसाकाने 35-वर्षीय सु वे हेशचा 6-2 6-2 असा पराभव केला आणि सलग 19वा विजय मिळवला.

2018 यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात सेरेनाचा पराभव करणारी ओसाका चौथ्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचली आहे. जपानच्या तिसर्‍या मानांकित ओसाकानेही गेल्या वर्षी यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले होते, तर 2019 मध्ये ती ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन ठरली होती.  दुसरीकडे, अमेरिकेच्या 22व्या मानांकित जेनिफर ब्रॅडीनेदुसर्‍या उपांत्य सामन्यात झेक प्रजासत्ताकाच्या 25व्या मानांकित करोलिना मुचोवाचा 6-6, 3-6, 6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला. ब्रॅडीचे हे पहिले ग्रँडस्लॅम फायनल आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी झालेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत ओसाकाने ब्रॅडीचा पराभव केला होता. गुरुवारी रॉड लेव्हर अरेनावर प्रेक्षक परतले. कोविड-19 लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना पाच दिवस स्टेडियमवर येण्यापासून रोखण्यात आले हिते. सेरेना आणि ओसाकाचा सामना पाहण्यास 7000 प्रेक्षक उपस्थित होते.

शिवाय, पुरुषांच्या सेमीफायनलबद्दल बोलायचे तर नोवाक जोकोविच आणि अस्लन करातसेव्ह यांच्यात पहिला सेमीफायनल आणि डॅनिल मेदवेदेव आणि स्टेफॅनोस त्सिटिपास यांच्यात दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे.