Australian Open 2021: Daniil Medvedev याची ऑस्ट्रेलियन ओपनच्या फायनलमध्ये धडक, Novak Djokovic याच्याविरुद्ध होणार अंतिम लढत
जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक डॅनियल मेडवेडेवने शुक्रवारी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. मेडवेडेवने 22-वर्षीय ग्रीक टेनिसपटू स्टेफानोस त्सिटिपासचा सरळ सेटमध्ये 6-6 6-2 7-5 पराभव केला. यासह आता मेडवेडेवचा रविवारी विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात सामना जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचशी होईल.
Australian Open 2021: जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांक डॅनियल मेडवेडेवने (Daniil Medvedev) शुक्रवारी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या (Australian Open) अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. मेडवेडेवने 22-वर्षीय ग्रीक टेनिसपटू स्टेफानोस त्सिटिपासचा (Stefanos Tsitsipas) सरळ सेटमध्ये 6-6 6-2 7-5 पराभव केला. यासह आता मेडवेडेवचा रविवारी विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात सामना जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित नोवाक जोकोविचशी (Novak Djokovic) होईल. दोन्ही खेळाडूंमधील पहिला सेट सुमारे 40 मिनिटे चालला. दुसर्या सेटमध्ये मेडवेडेवला 36 मिनिटांत यश मिळाले. तिसर्या सेटमध्ये, त्सिटिपासने जबरदस्त पुनरागमन केले, परंतु 25-वर्षीय रशियन खेळाडूने संयम दाखवत सामना जिंकला. अंतिम सामन्यात मेडवेडेवचा सामना आठ वेळा ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोकोविचशी होईल. (Australian Open 2021: नाओमी ओसाका आणि जेनिफर ब्रॅडी यांच्यात रंगणार ऑस्ट्रेलिया ओपन ग्रँड स्लॅमची किताबी लढत)
गुरुवारी जोकोविचने रशियाच्या अस्लान करातसेव्हला पराभूत केले आणि वर्षाच्या पहिल्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. 33 वर्षीय जोकोविचने सेमीफायनल सामन्यात 6-3, 6-4, 6-2 असा विजय मिळवला. दुसरीकडे, मेडवेडेवत्याने आपल्या प्रथम ऑस्ट्रेलियन ओपन फायनलमध्ये प्रवेश केला आणि Yevgeny Kafelnikov व मरात सफिन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात प्रवेश करणारा तिसरा रशियन खेळाडू ठरला. शिवाय, ग्रीक खेळाडूवरील विजयासह मेडवेडेवने सलग 20 सामने जिंकण्याचाही पराक्रम केला आहे. बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला जेव्हा रॉड लेव्हर एरेनामध्ये 22-वर्षीय स्टेफानोस त्सिटिपासने अनुभवी राफेल नडालला क्वार्टर-फायनलमध्ये पराभूत करत रेकॉर्ड 21व्या ग्रँड स्लॅमच्या शर्यतीतून बाहेर केले आणि सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं. पहिले दोन सेट गमावल्यानंतर ग्रीसच्या युवा खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले आणि 3-6, 2-6, 7-6, 6-4, 7-5 ने बाजी मारली.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला खेळाडूंचा अंतिम सामना शनिवारी जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅडी यांच्यात होणार आहे. तीन वेळा स्लॅम चॅम्पियन ओसाका 20 सामन्यांच्या विजयरथावर स्वार आहे आणि स्लॅम फायनलमध्ये आजवर कधीही हारलेली नाही. तिने दोन यूएस ओपन जिंकले असून दुसऱ्या ऑस्ट्रेलियन विजेतेपदासाठी कोर्टवर उतरेल. दरम्यान, ब्रॅडीने पहिल्यांदा ग्रँड स्लॅमच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)