Viral Video: एमएस धोनी चं मालदीव वेकेशन; RP Singh आणि पीयूष चावला यांच्यासाठी बनला पानी पूरी वाला
व्हिडिओमध्ये धोनी आपला माजी सहकारी रुद्र प्रताप (आरपी) सिंह आणि पीयूष चावला यांना पाणी पुरी (गोलगप्पा) बनवून देत आहे.
भारताला दोन विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एका नवीन अवतारात दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी आपला माजी सहकारी रुद्र प्रताप (आरपी) सिंह (RP Singh) आणि पीयूष चावला (Piyush Chawla) यांना पाणी पुरी (गोलगप्पा) बनवून देत आहे. क्रिकेटच्या उंचावर असणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार धोनी आजकाल मालदीवमध्ये मित्रांसोबत सुटी घालवत आहे. सोशल मीडियावर धोनीचे दोन व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये तो मित्रांसाठी गोलगप्पा बनवित आहे, तर दुसर्यामध्ये तो व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये धोनी क्रिकेटर पियुष चावला आणि आरपीसोबत दिसला आहे आणि त्याच्यासाठी गोलगप्पा तयार करताना दिसला. (IND vs NZ 4th T20I: वेलिंग्टन स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध फॅन्सने झळकावलं 'We Miss You Dhoni' चं पोस्टर, पाहा Tweet)
एका यूजरने धोनीचा हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि पोस्टमध्ये लिहिले की, "थेट मालदीवमधून. आपला रॉकस्टार पाणी पुरी बनवित आहे." हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर त्याचे कौतुक होत आहे. धोनीला पानिपुरी खाण्याचा खूप शौकीन असल्याचे म्हटले जात आहे. यापूर्वी, धोनी आपल्या मित्रांसह मालदीवमध्ये व्हॉलीबॉल खेळताना दिसला. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पाहा धोनीचे हे दोन्ही व्हिडिओ इथे:
पाणी पुरी वाला धोनी
धोनी वॉलीबॉल खेळताना
दरम्यान, अलीकडेच बीसीसीआयने धोनीला आपल्या केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकले होते. 38 वर्षीय धोनीने जुलै 2019 पासून कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनीने त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना विश्वचषक सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. 6 महिन्यांहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले नसल्यामुळे आणि सध्या भविष्यातील योजनांची स्पष्ट माहिती नसल्यामुळे बीसीसीआयने धोनीला केंद्रीय कराराच्या यादीतून काढून टाकले.