Mohammad Shami Contemplated Suicide: 19 व्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उडी मारत मोहम्मद शमीचा आत्महत्येचा प्रयत्न; मित्राकडून धक्कादायक खुलासा

त्याशिवाय, पत्नी हसीन जहाँ त्याला सोडून गेली. मुलगीही त्याच्या पत्नीसोबत राहते हे त्याच्यासाठी त्रासदायक होते. त्यामुळे शमीेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप शमी याच्या मित्राने केला.

Photo Credit- X

Mohammad Shami Contemplated Suicide: भारतीय संघाचा भेदक गोलंदाज मोहम्मद शमी(Mohammad Shami)बद्दल एक मोठा खुलासा त्याच्या मित्राने केला आहे. शुभंकर मिश्रा याच्या पोडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत मित्र उमेश कुमार (Umesh Kumar)याने शमी बद्दल बोलताना म्हटले की, 'शमीचा त्याच्या पत्नीपासून विभक्त होत असतानाचा काळ शमीसाठी खूपच तणावपूर्ण होता. त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा होता. त्याशिवाय, मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे शमीने आत्महत्येचा विचारही केला होता. असे म्हटले आहे.' (हेही वाचा:Mohammed Shami on Inzmam Ul Haq: टीम इंडियावर बॉल टॅम्परिंगचा आरोप, आता मोहम्मद शमीने पाकिस्तानी इंझमाम उल हकला फटकारले (Watch Video) )

मोहम्मद शमीच्या जीवनात अनेक चढ उतारांचा त्याने सामना केला आहे. पत्नी हसीन जहाँ त्याला सोडून गेली. मुलगीही त्याच्या पत्नीसोबत राहते हे त्याच्यासाठी त्रासदायक आहे. उमेशने सांगितले की, “शमी त्यावेळी सर्व गोष्टींशी लढत होता. तो माझ्यासोबत माझ्या घरी राहत होता. पण जेव्हा पाकिस्तानबरोबर फिक्सिंग झाल्याचे आरोप समोर आले त्या रात्री चौकशी झाली, तेव्हा तो आतून तुटला हे सर्व सहन करण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप सहन करू शकला नाही. (हेही वाचा: IND-W Beat NEP-W, Asia Cup 2024 10th Match Live Score Board: भारताचा नेपाळवर 82 धावांनी शानदार विजय, सेमीफायनलमध्ये जागी केली पक्की)

पोस्ट पहा

पहाटे 4 वाजता पाणी प्यायला उठल्यावर किचनच्या दिशेने जात असताना शमी बाल्कनीत उभा असल्याचे त्याला दिसले. ते 19व्या मजल्यावर राहत होते. त्यावेळी काय घडलं असेल याचा त्याने विचार केला. ती रात्र शमीच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी रात्र होती. नंतर, एके दिवशी, आम्ही बोलत असताना, त्याच्या फोनवर एक मेसेज आला की त्याला या प्रकरणाच्या चौकशी समितीकडून क्लीन चिट मिळाली आहे. कदाचित विश्वचषक जिंकूनही त्याला जितका आनंद झाला नसता तितका आनंद तो क्लीन चिटचा मेसेज वाचल्यावर झाला. असे उमेश याने म्हटले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif