Kieron Pollard Birthday Special: 'उडता पोलार्ड'! वेस्ट इंडियन कीरोन पोलार्ड याने पकडलेले 'हे' चकित करणारे एक हाती कॅच पाहून तुम्हीही म्हणाल Wow
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवर पोलार्डने ऑस्ट्रेलियाच्या मातीवर खेळताना घेतलेल्या कॅचेसचा व्हिडिओ अपलोड केला तो तुम्हालाही नक्की प्रभावित करेल.
वेस्ट इंडिज (West Indies) आणि मुंबई इंडियन्स ऑल-राउंडर किरोन पोलार्ड (Kieron Pollard) याचा जन्म 12 मे, 1987 रोजी, टॅकरीगुआ, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे झाला होता. अष्टपैलू खेळाडू विस्फोटक फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी यासाठी ओळखला जातो. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच 2010 मध्ये तो मुंबई इंडियन्सकडून खेळत संयुक्तपणे इंडियन प्रीमिअर लीगचा (IPL) सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होता. वेस्ट इंडीजच्या खेळाडूने केवळ आयपीएलमध्येच नव्हे तर इतर विविध लीगमध्येही आपले कौशल्य सिद्ध केले आहे. पोलार्ड फक्त फलंदाजी आणि गोलंदाजीनेच नाही तर फिल्डिंगनेही क्रिकेटमध्ये महत्वाची योगदान दिले आहे. त्याने आजवर अनेक एक हाताने झेल पकडले आहे जे पाहून सर्वच चकित होतील. पोलार्डची आयपीएल फ्रँचायसी मुंबई इंडियन्सने आज ट्विटरवरून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (वेस्ट इंडिज संघातील खेळाडूंना जानेवारी 2020 पासून नाही मिळाली मॅच फी, जाणून घ्या कारण)
पोलार्डने बॅट आणि त्यानंतर विशेषतः फिल्डिंगने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) त्यांच्या यूट्यूब अकाऊंटवर पोलार्डने ऑस्ट्रेलियाच्या मातीवर खेळताना घेतलेल्या कॅचेसचा व्हिडिओ अपलोड केला तो तुम्हालाही नक्की प्रभावित करेल. त्याच्या 33 व्या वाढदिवसाच्या निमित्त ऑस्ट्रेलियामध्ये अष्टपैलू खेळाडूने घेतलेले आश्चर्यकारक कॅच पहा.
दरम्यान, वेस्ट इंडीजला 2012 आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यासाठी पोलार्डने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. 2019 वर्ल्ड कपमध्ये टीमच्या खराब प्रदर्शनानंतर पोलार्डकडे विंडीज टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले आणि अष्टपैलू खेळाडूने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीला निश्चितच सुरुवात केली. एप्रिल 2007 मध्ये पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि तेव्हापासून विंडीज टीमचा महत्वपूर्ण सदस्य बनला आहेत. यासह, जगभरातील टी-20 लीगमधील तो एक लोकप्रिय नाव आहे. इतकंच की 500 टी -20 सामन्यात खेळणारा तो पहिला खेळाडू आहे. 2014 नंतर कॅरेबियन बोर्डाशी झालेल्या वादामुळे त्याला बऱ्याच बरीच आंतरराष्ट्रीय सामन्यांना मुकावे लागले. पोलार्डच्या वाढदिवशी Latestly ची संपूर्ण टीम वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपण अधिक विकेट्स घेवो आणि विक्रमी खेळी करत राहवो!