Kane Williamson Welcomes Baby Girl: केन विल्यमसनच्या घरी गोंडस मुलीचं आगमन, मुलीला हृदयाशी लावलेला फोटो पोस्ट करून दिली गुड न्यूज (See Photo)
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन आणि त्याची साथीदार सारा रहीम यांच्या घरी बुधवारी एका चिमुकलीचे आगमन झाले. “कुणाच्याही आयुष्यातील ही एक अतिशय रोमांचक वेळ आहे आणि ती नक्कीच माझ्यासाठी आहे,” विल्यमसनने त्याच्या कुटुंबासमवेत जाण्यासाठी घरी येण्यापूर्वी म्हटले, NZ हेराल्ड ने सांगितले.
Kane Williamson Welcomes Baby Girl: न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि त्याची साथीदार सारा रहीम (Sarah Raheem) यांच्या घरी बुधवारी एका चिमुकलीचे आगमन झाले. 30-वर्षीय विल्यम्सनने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) पहिल्या कसोटी सामन्यात विजयी कामगिरी केल्यावर आपल्या पहिल्या बाळाच्या आगमनासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुट्टी घेतली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातून विल्यमसनने माघार घेतली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (New Zealand Cricket Board) कर्णधाराच्या निर्णायचं स्वागत करत त्याची सुट्टी मंजूर केली होती. “कुणाच्याही आयुष्यातील ही एक अतिशय रोमांचक वेळ आहे आणि ती नक्कीच माझ्यासाठी आहे,” विल्यमसनने त्याच्या कुटुंबासमवेत जाण्यासाठी घरी येण्यापूर्वी म्हटले, NZ हेराल्ड ने सांगितले. आणि आता केनने नुकतंच इंस्टाग्रामवर आपल्या मुलीला हृदयाशी लावलेला फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली.
"आमच्या कुटुंबात एक सुंदर मुलीचे स्वागत करताना आनंद गगणात मावेना," विल्यम्सनने आपल्या चुलकीला आपल्या हृदयाच्या जवळ ठेवलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले. अभिनंदन संदेश पाठवणाऱ्यांमध्ये विल्यमसनचा माजी सनरायझर्स हैदराबादचा सहकारी शिखर धवन पहिलाच ठरला. धवनने लिहिले, “तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला अभिनंदन आणि खूप प्रेम." दुसरीकडे, विल्यमसन आता पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यातून मैदानावर पुनरागमन करेल.
उल्लेखनीय म्हणजे, विल्यमसनने रजेवर जाण्यापूर्वी वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा फाटकावल्या. ब्लॅककॅप्स स्टार इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान त्याच्या पत्नीपासून दूर होता ज्यात तो सनरायझर्स हैदराबादकडून पूर्ण मोसम खेळला होता. विशेष म्हणजे विल्यमसनचा चांगला मित्र विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या पितृत्वा रजेवर जाणार आहे. अॅडिलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट मायदेशी परतणार आहे. कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मा यांच्या घरी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात नवीन पाहुण्याचं आगमन होणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)