Coronavirus: भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा क्रिकेटपटू आता 'या' अंदाजात देतोय कोरोना व्हायरसविरुद्ध लढा
जोगिंदर सध्या हरियाणा पोलिसात डीएसपी म्हणून कार्यरत आहे. शर्मा सध्या आपले कर्तव्य बजावत आहेत, परंतु त्याने यासाठी सर्वांकडून सहकार्याची मागणी देखील केली आहे.
टी-10 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेच्या विजेतेपद मिळवून देणारा गोलंदाज जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) कोरोना व्हायरस (Coronavirus) आजाराविरुद्ध लढ्यात सामील झाला आहे. जोगिंदर सध्या हरियाणा पोलिसात (Haryana Police) डीएसपी म्हणून कार्यरत आहे. शर्मा सध्या आपले कर्तव्य बजावत आहेत, परंतु त्याने यासाठी सर्वांकडून सहकार्याची मागणी देखील केली आहे. जोगिंदर लोकांना घरात राहून सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे जवळपास लाखो लोक करोनातून पूर्णपणे बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. 2007 मध्ये आयोजित केलेल्या पहिल्या टी-20 विश्वचषक जिंकवून देणारा जोगिंदर रात्रभरात स्टार म्हणून उदयास आला. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय समान खेळला नाही आणि हरियाणा पोलिसात कार्यरत झाला. (Coronavirus Lockdown: सौरव गांगुली ने पुढे केला मदतीचा हात; गरीबांमध्ये वाटणार 50 लाख रुपयांचे तांदूळ,)
करोनाचं संकट उद्भवल्याने सदैव व्यस्त असणारे खेळाडू आता घरात बसून आहेत. अगदी स्टार क्रिकेटपटूही घरातच वेळ घालवत आहे. असे असताना जोगिंदर आपले पोलिसाचे कर्तव्य बजावताना दिसतो आहे. थेट रस्त्यावर उतरुन तो करोना व्हायरसविरुद्ध लढाईत लोकांची मदत करत आहे. भीतीच्या वातावरणामध्ये सध्या डॉक्टरांसह पोलिस कर्मचारी देशभरातील लोकांच्या मदतीसाठी मोठा हातभार लावत आहेत. जोगिंदर यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर ट्वीट करून लिहिले की, "कोरोना व्हायरसपासून बचाव हा एकमेव मुक्त होण्याचा मार्ग आहे. एकत्र राहून या साथीच्या परिस्थितीशी लढा. आमची मदत करा. जय हिंद."
2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये जोगिंदर भारतीय संघाचा एक भाग होता आणि त्याने पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात अंतिम ओव्हर टाकली ज्यामध्ये त्याने मिसबाह-उल-हकला बाद करून भारताला विजेतेपद मिळवून दिले.