Hasin Jahan Receives Death Threats: राम मंदिर भूमिपूजनवर शुभेच्छा देणाऱ्या मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांला जीवे मारण्याची धमकी; पंतप्रधान मोदी, अमित शाहकडे मागितली मदत
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावर हिंदु समुदायाला शुभेच्छा दिल्याबद्दल क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने कोलकाता पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाबद्दल शुभेच्छा पोस्ट शेअर केल्याबद्दल जहाँला बलात्कार आणि जेवेमारण्याची धमकी दिली जात असल्याने तिने तक्रार केली आहे.
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावर (Ram Mandir Bhoomi Pujan) हिंदु समुदायाला शुभेच्छा दिल्याबद्दल क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी (Mohammed Shami Wife) हसीन जहांने (Hasin Jahan) कोलकाता पोलिसांच्या (Kolkata Police) सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. राम मंदिर भूमिपूजनाबद्दल शुभेच्छा पोस्ट शेअर केल्याबद्दल जहाँला बलात्कार आणि जेवेमारण्याची धमकी (Death Threats) दिली जात असल्याने तिने तक्रार केली आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या राम मंदिराच्या शुभेच्छा सुसंवादाचे प्रतीक म्हणून वर्णन केले, तर कट्टरपंथीयांनी तिच्यावर निशाणा साधला आणि जिवे मारण्याची धमकीही दिली आहे. हसीनने आरोपींवर कारवाई करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी करत इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. 5 ऑगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमीपूजन करण्यात आले. यात प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठे चेहरे उपस्थित होते. राम मंदिर निर्माणाबाबत लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. (Watch Video: न्यूड फोटोनंतर मोहम्मद शामी याच्या पत्नीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल)
उत्साही लोकांमध्ये भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांचा समावेश आहे. जहाँने विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या अकाउंटद्वारे श्री राम मंदिर भूमिपूजनासाठी देशाचे अभिनंदन केले आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. तेव्हापासून तिच्यावर टीकाकारांकडून निशाणा साधला जात आहे. या संदर्भात तिला धमकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि संरक्षणाची मागणी केली. अशी भित्री कृत्य ही आरोपींमधील अत्यंत लहान मानसिकतेचा पुरावा आहे असे तिने म्हटले. ती म्हणली की पंतप्रधानांबरोबरच हा संपूर्ण भाग उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे आणि कट्टरतावाद्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी आशा आहे.
5 ऑगस्टला अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. दिवाळीसारख्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी भव्य राम मंदिराची पायाभरणी केली. यासह भारतीय इतिहासात आणखी एक अध्याय जोडला गेला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)