भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाने (Hasin Jahan) गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर (Social Media) एक न्यूड फोटो शेअर केला होता. ज्यामुळे हसीन खूप चर्चेत आली होती. नुकताच हसीनने इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओने देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या व्हिडीओमध्ये हसीन एका मैत्रिणीबरोबर आहे. हसीनची ही मैत्रिण हुक्का ओढत आहे, त्याचबरोबर ती मद्यपान करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. यावेळी पार्टीमध्ये एक पंजाबी गाणे सुरु आहे. या गाण्यावर हसीन आणि तिची मैत्रिण डुलत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हसीन नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी आपल्या न्यूड फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे हसीन चर्चेत आली होती. आता तर हसीनने एका पार्टीचा व्हिडीओ शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. या नवीन व्हिडिओमध्ये हसीन जहा तिच्या मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना हसीनने लिहले आहे की, तुम्ही दुखात असतानाही हसत असाल तर, जगात कोणीच तुम्हाला दुख पोहचवू शकत नाही. जे फळ गोड आहे, लोक त्यालाच दगड मारतात. हा निसर्गाचा नियमच आहे, असे कॅप्शन तिने दिले आहे. हे देखील वाचा- नवरा झोपेत असताना नायजेरियन महिलेने घेतला पतीच्या जननेंद्रियाचा चावा

हसीन जहा यांची इंस्टाग्राम पोस्ट-

हसीन हि सातत्याने सोशल मीडियावर अक्टिव्ह असल्याचे दिसत आहे. हसीनने गेल्या काही दिवसापूर्वी सेमी न्यूड फोटो शेअर केला होता. त्यावेळी मोहम्मद शामी त्यांच्यासोबत असल्याचा दावा तिने केला होता. त्यानंतर तिला नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केले होते. दरम्यान, माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत, असे मोहम्मद शामी म्हणाला होता. त्यानंतर हसीनने एक डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता.