IND vs WI 2nd Test Day 3: इशांत शर्माने आशिया खंडाबाहेर रचला इतिहास, कपिल देव यांचे विक्रम मोडीत

या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 299 धावांनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने भारतीय संघाचे माजी खेळाडू कपिल देव (Kapil dev) यांचा विक्रम मोडीत काढत आशियाखंडतील (Asia) सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय ठरला आहे.

Virat Kohli Jasprit Bumrah (Photo Credit: Getty Image)

भारत विरुद्ध वेस्टइंडीज (indiaVsWestIndies) संघात सबिना पार्क (Sabina park),किंग्स्टन येथे दुसरा कसोटी सामना (2nd test) सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडीजचा पहिला डाव 117 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारतीय संघाने 299 धावांनी आघाडी घेतली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) याने भारतीय संघाचे माजी खेळाडू कपिल देव (Kapil dev) यांचा विक्रम मोडीत काढत आशियाखंडतील (Asia) सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा भारतीय ठरला आहे. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumraha) सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या आहेत, तर मोहम्मद शमीने (Mohhamad Shami) 2 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) प्रत्येकी 1 विकेट घेतली आहे.

भारत विरुद्ध वेस्टइंडीज कसोटी सामन्यात इशांत शर्माने वेस्टइंडीज संघाचा विकेटकीपर याला बाद केले होते. याचबरोबर इंशात शर्माने भारतीय संघाचा माजी खेळाडू कपिल देव यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर 155 विकेट्स घेतल्या आहेत. वेस्टइंडीज सामन्या दरम्यान इशांतने 1 विकेट घेवून कपिल देव यांनी आशिया खंडाबाहेर घेतलेल्या 155 विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले आहे. हे देखील वाचा-IND vs WI 2nd Test Day 3: वेस्ट इंडिजवर टीम इंडिया भारी, स्टम्पपर्यंत भारताकडे 299 धावांची आघाडी

आशिया खंडाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणाऱ्या एकूण भारतीय गोलंदाजांमध्ये माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (Anil kumble) हे अव्वल स्थानावर आहे. अनिल कुंबळे यांनी आशिया खंडाबाहेर २०० विकेट्स घेतल्या आहेत. इशांत शर्मा आशियाबाहेर 200 विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याच्या यादीत इशांत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

आशियाबाहेर सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाजांची यादी

200 – अनिल कुंबळे (Anil Kumble) (50 सामने)

156 – इशांत शर्मा (Ishant Sharma) (46 सामने)

155 – कपिल देव (Kapil Dev) (45 सामने)

147 – झहिर खान (Zahir Khan) (38 सामने)

123 – बिशनसिंग बेदी (Bishan Singh Bedi) (34 सामने)

117 – हरभजन सिंग (Harbhajan Singh) (32 सामने)

117 – जवागल श्रीनाथ (Javagal Srinath) (31 सामने)

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा कसोटी सामना जमैकाच्या सबिना पार्क येथे खेळला जात आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडीज संघाने तिसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 गडी गमावून 45 धावा केल्या. चौथ्या दिवशी भारताला विजयासाठी 8 विकेटची आवश्यकता होती. जॉन कॅम्पबेल (John Campbell) याने 16 आणि क्रेग ब्रेथवेट (Kraig Brathwaite) 3 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. डॅरेन ब्राव्हो 18 आणि शाहमार ब्रुक्स 04 धावांवर खेळत आहेत.