IND vs WI 3rd T20I मॅचआधी कीरोन पोलार्ड याला ICC चा दणका, आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सामना शुल्काच्या 20% दंड

त्याला सामन्याच्या 20 टक्के मानधनाची रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे. आयसीसीने याबाबाद प्रेस रिलीझ जारी केले आहे. शिवाय त्याला एक डिमेरिट अंकही देण्यात आला आहे.

कीरोन पोलार्ड (Photo Credit: @ICC/Twitter)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघात आज तिसरा आणि अंतिम टी-20 सामना गयानामध्ये खेळवण्यात येणार आहे. दोन्ही संघातील पहिले दोन्ही टी-20 सामने जिंकून भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली आहे. भारत-वेस्ट इंडिजमधील दुसऱ्या टी-20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे 22 धावांनी विजय मिळवला. पहिले फलंदाजी करत भारताने 167 धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करत विंडीजला 15.3 ओव्हरमध्ये 98 धावांपर्यंतच मजल मारता आली. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला 120 धावा करणं गरजेचं होतं. मालिका गमावण्यासोबत विंडिजच्या एका खेळाडूलाही ICC कडून देण्यात आला आहे. विंडीजचा तुफान फटकेबाजी करणारा कीरोन पोलार्ड (Kieron Pollard) याला आयसीसी (ICC) कडून दंड ठोठावण्यात आला आहे. (Live Streaming of IND vs WI, 3rd T20I Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

भारत-वेस्ट इंडिजमधूल दुसऱ्या टी-20 सामन्यात पोलार्डने मैदानावर राखीव खेळाडूला बोलावून घेतल्यामुळे त्याच्याकडून ICC च्या नियमाचा भंग झाला. राखीव खेळाडूला मैदानात क्षेत्ररक्षणासाठी बोलावण्याआधी पंचांची परवानगी आवश्यक असते. पोलार्डने जेव्हा पंचांना याबाबत विचारले होते तेव्हा पंचांनी त्याला ओव्हर पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्यास सांगितले होते. पण पोलार्डने ओव्हर संपायच्या आधीच राखीव खेळाडूला मैदानावर बोलावून घेतले. त्यामुळे ICC च्या आचारसंहितेतील कलम 2.4 अन्वये त्याच्याकडून नियम मोडण्यात आला. परिणामी त्याला सामन्याच्या 20 टक्के मानधनाची रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे. आयसीसीने याबाबाद प्रेस रिलीझ जारी केले आहे. शिवाय त्याला एक डिमेरिट अंकही देण्यात आला आहे.

दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवत भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आजच्या तिसऱ्या आणि अंतिम सामना जिंकत टीम इंडियाकडे क्लीन-स्वीप करण्याची संधी आहे. वेस्ट इंडिजसाठी या मालिकेत पोलार्डने सर्वात जास्त धावा केल्या आहे. पहिल्या टी-20 सामन्यात 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर दुसऱ्या सामन्यात तो नाबाद राहिला. पावसाने व्यत्यय आणल्याने वेस्ट इंडिजला दुसऱ्या सामन्यात देखील पराभवाचा सामना करावा लागला.