IND vs WI: कोणाची नक्कल करणे हे त्याचे तळवे चालण्यासारखे! मोहम्मद शमी च्या मिलिटरी स्टाईल सॅल्यूट वर शेल्डन कॉटरेल ने तोडले मौन

आता कॉटरेलने याबाबत भाष्य करत शमीच्या गोलंदाजीचे कौतुक करत लिहिले, 'कोणाची नक्कल करणे हे त्याचे तळवे चालण्यासारखे आहे'.

MANCHESTER, ENGLAND - JUNE 22: Sheldon Cottrell of West Indies dons his traditional salute after trapping Martin Guptill of New Zealand lbw during the Group Stage match of the ICC Cricket World Cup 2019 between West Indies and New Zealand at Old Trafford on June 22, 2019 in Manchester, England. (Photo by Michael Steele/Getty Images)

टीम इंडिया (Team India) चा वेगवान गोलंदाज मोहम्मह शमी (Mohammed Shami) ने आपल्या कामगिरीने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. केवळ दोन खेळल्या शमीने 8 विकेट घेत प्रतिस्पर्धी संघांना हादरून सोडले आहे. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) च्या दुखापतीमुळं संघात आलेल्या शमीने मैदान गाजवलं. अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्ध शमीने हॅट-ट्रिक घेतली तर वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध चार विकेट्स घेत टीम ला विजयाच्या नेले. विंडीज विरुद्ध सामन्यात शमी ने शेल्डन कॉटरेल (Sheldon Cottrell) च्या मिलिट्री स्टाइल सैल्यूट करत आपली एक विकेट सेलीब्रेट केली. (IND vs WI, ICC World Cup 2019: मोहम्मद शमी ने केले शेल्डन कॉटरेल च्या मिलिट्री स्टाइल सैल्यूट चे अनुकरण; विराट, चहल ला हसू अनावर झाले Video)

शमीचे हे कृत्याने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि युझवेन्द्र चहल (Yuzvendra Chahal) ला हसू अनावर झाले. दरम्यान कॉटरेललाही शामीच्या अनुकरणाने हसू फुटले. आणि आता कॉटरेलने याबाबत भाष्य करत शमीच्या गोलंदाजीचे कौतुक केले. कॉटरेलने ट्विटरवर लिहिले, 'खूपच मज्जा! ग्रेट बॉलिंग! कोणाची नक्कल करणे हे त्याचे तळवे चालण्यासारखे आहे'.

दरम्यान, भारतने प्रथम फलंदाजी करताना कोहली आणि एम एस धोनी (MS Dhoni) च्या अर्धशतकांच्या जोरावर 7 बाद 268 धावा केल्या. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाला 143 इतकीच मजल मारता आली. वेस्ट इंडिजविरुद्ध शमीने 6.2 ओव्हर्स मध्ये 16 धावा देत ४ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाने भारतीय संघाने विश्वकप मधील आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडिया चा पुढील सामना यजमान इंग्लंड (England) शी 30 जूनला होईल.