IPL Auction 2025 Live

IND vs WI 2nd T20I: टॉस जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, टीम इंडियामध्ये कोणताही बदल नाही

टीम इंडियाने आजचा सामना जिंकल्यास वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खिशात घालेल.

भारत आणि वेस्ट इंडिज संघातील दुसऱ्या टी-20 सामन्यात टॉस जिंकून भारताने पहिले गोलंदाजीचा निणर्य घेतला. दोन्ही संघातील हा सामना अमेरिकेचा फ्लोरिडा शहरात खेळाला जात आहे. टीम इंडियाने आजचा सामना जिंकल्यास वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खिशात घालेल. आजच्या या सामन्यासाठी भारतीय संघात कोणाही बदल नाही आहे. तर वेस्ट इंडिज संघात एक बदल करण्यात आला आहे. पहिला टी-20 भारताने जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विंडीज संघाची फलंदाजी सध्या दुबळी झाली आहे. संघात ख्रिस गेल, आंद्रे रसेल यासारखे दिग्गज खेळाडू अनुपस्थित आहे. (Live Streaming of IND vs WI, 2nd T20I Match: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर)

भारताने विंडीजविरुद्ध पहिला टी-20 सामना चार गडी राखून जिंकला. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनी याने सामन्यात 3 गडी बाद केले. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला तरी त्यासाठी फलंदाजांची मात्र दमछाक झाली. 96 धावांचे लक्ष पूर्ण करण्यासाठी 18 ओव्हर पर्यंत झुंज द्यावी लागली.

भारतीय फलंदाजांनी मात्र सर्वांची निराशा केली. भारतीय फलंदाजांनी मात्र सर्वांची निराशा केली. दुखापतीतून संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवन (Shikhar Dhawan) याला जास्त काही करता आले नाही. तर नुकत्याच संपुष्टात आलेल्या क्रिकेट विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) देह्खील विंडीज गोलंदाजांसमोर हताश दिसला. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील संघासाठी जास्त योगदान देऊ शकला नाही.  पण विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सैनी (Navdeep Saini) ने सर्वांच्या मनावर छाप सोडली. सैनीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात एका ओव्हरमध्ये लागोपाठ दोन गडी बाद केले.

असा आहे भारतीय संघ:भारत: शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली (कॅप्टन), रिषभ पंत, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, खालील अहमद आणि नवदीप सैनी.