IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: ह्या 5 खेळाडूं मधील Battle ठरेल मुख्य आकर्षण
भारत आणि न्यूझीलंडकडे अनेक उत्तम आणि उच्च दर्जाचे खेळाडू आहेत जे कधीही गेम बदलून टाकण्याची ताकत ठेवतात.
इंग्लंडमध्ये (England) सुरु असलेल्या ICC वर्ल्ड कपमध्ये आपली विजयी घोडदौड सुरु ठेंवण्याच्या उद्देशाने भारतीय संघ न्यूझीलंड (New Zealand) शी दोन हात करेल. भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड सामना गुरुवारी ट्रेंट ब्रिज (Trent Bridge), नॉटिंगंघम (Nottingham) येथे खेळवली जाणार आहे. भारतीय संघाने ह्याआधी जरी ऑस्ट्रेलियाला (Australia) हरवले असले तरी त्यांना किवीजपासून सावध राहणे आवश्यक आहे कारण ते कांगारुजच्या तुलनेत जास्त स्पर्धात्मक होतील. (IND vs NZ, ICC Cricket World Cup 2019: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यवर पावसाचे सावट)
भारत आणि न्यूझीलंडकडे अनेक उत्तम आणि उच्च दर्जाचे खेळाडू आहेत जे कधीही गेम बदलून टाकण्याची ताकत ठेवतात. ट्रेंट ब्रिज, नॉटिंगंघम येथे खेळताना, ह्या पाच भारत-न्यूझीलंड खेळाडूंमधील लढत सामन्यातच मुख्य आकर्षण ठरेल:
विराट कोहली (Virat Kohli) V/S ट्रेंट बोल्ट (Trent Boult)
भारताचा कर्णधार विराट कोहली हा कोणत्याही मैचमधलं मुख्य आकर्षण असतो. कोहलीचा न्यूझीलंड विरुद्ध वनडे मधला रेकॉर्ड चांगला आहे. पण त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका हा किवी जलद गोलंदाज ट्रेंट बोल्ट असेल. बोल्ट कोहलीला आउट-स्विंग आणि इन-स्विंगसह सारखे बॉल घालून त्रास देऊ शकतो. एकूणच बोल्टने भारताविरूद्ध 12 सामन्यांत 22 विकेट घेतल्या आहेत.
रोहित शर्मा (Rohit Sharma) V/S टीम सौथी (Tim Southee)
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा हा सध्या आपली जबरदस्त फॉर्म मधे आहे. रोहितने भारताच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिके विरुद्ध एक शतक तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक अर्ध-शतक ठोकलं आहे. पण आता रोहितचा सामना हा न्यूझीलंडचा जलद गोलंदाच टीम सौथीशी होणार. सौथीने 2013 पासून भारताच्या टॉप-ऑर्डरच्या विरुद्ध सर्वोत्तम कामगिरी नोंदविली आहे. सौथीने रोहितला मागील १४ सामन्यात ५ वेळा बाद केला आहे शिवाय सौथी विरुद्ध रोहितचा स्ट्राइक रेट आणि डॉट बॉलची टक्केवारी हि शिखर धवन आणि विराट कोहलीपेक्षाही वाईट आहे. सौथी विरुद्ध रोहितचा स्ट्राइक रेट 67.88 आणि डॉट बॉलची टक्केवारी 66.42 इतकी आहे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) V/S मिशेल सेंटनर (Mitchell Santner)
पंड्या आणि सेंटनर मधील battle हि बघण्यासारखी असणार आहे. आत्ता पर्यंत झालेल्या दोन सामन्यात पंड्या ने आपल्या कामगिरीने क्रिकेट प्रेमींची मन जिंकली आहे. सेंटनर हा जगातील सर्वात चतुर स्पिनरांपैकी एक आहे. न्यूझीलंडचा हा गुगावात तारा आपल्या गोलंदाजीने अनेक श्रेष्ठ फलंदाजाला गोंधळवू शकतो. दुसरीकडे, पंड्याला स्पिन गोलंदाजां विरुद्ध खेळण्यास खूप आवडते. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय स्पिनर्स सतत षटकार मारल्या आहेत. मिशेल सँटनेर आणि हार्डिक पंड्या मधील लढाई भारत विरुद्ध न्यूझीलंड सामान्यत एक महत्त्वाचा लढा असेल.
जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) V/S मार्टिन गप्टिल (Martin Guptill)
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांच्या अविश्वसनीय खेळ दाखवण्याची प्रथा सुरूच आहे. आपल्या क्रिकेट करिअर मधला पहिलाच विश्वकप खेळण्यारा बुमराचा सामना न्यूझीलंडच्या टॉप-ऑर्डर फलंदाज मार्टिन गप्टिलशी होईल. गप्टिल का न्यूझीलंडचा मारक फलंदाज आहे आणि एकदाकी त्याने मोठे शॉट्स खेळायला सुरुवात केली कि त्याला थांबवणे अशक्य आहे. बुमराच्या विरुद्ध यशस्वी होण्यासाठी गप्टीलला बुमराच्या ऑर्थोडॉक्स खेळाचा उपयोग करावा लागेल शिवाय मोठे शॉट्स खेळताना सावधही राहावे लागणार.
कुलदीप यादव (Kuldeep Yadav) V/S केन विलियमसन (Kane Williamson)
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन हा किवीचा सर्वोत्तम फलंदाज आहे. विलियमसनच्या कप्तानी सह त्याची फलंदाजीची टीमसाठी महत्वाची आहे. नंबर तीनवर फलंदाजी करणारा विलियमसन वनडे क्रिकेट मध्ये मोठे शॉट्स खेळण्याची ताकद ठेवतो आणि टीमला एका मोठ्या स्कोरकडे नेण्यास मदतही करू शकतो. विल्यमसन हा स्पिन बॉवलिंग खेळणारा चांगला खेळाडू आहे. विलियमसन आणि कुलदीप यादव मधील सामना बघताना प्रेक्षकांना भरपूर मजा येणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)