IND vs ENG 2021: इंग्लंडविरुद्ध कसोटीत होणार सूर्यकुमार यादवचा ‘उदय’? पाहा कोणत्या 3 खेळाडूंच्या जागी मिळू शकते ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये संधी
इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘उदय’ झाला आहे. त्यानंतर सूर्याने श्रीलंका दौऱ्यावर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आता तो कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन खेळाडूंच्या जागी स्थान दिले जाऊ शकते.
IND vs ENG 2021: पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांना इंग्लंड दौर्यासाठी (England Tour) भारताच्या कसोटी संघात (India Test Team) स्थान देण्यात आले आहे, तर शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि अवेश खान यांना दुखापतीमुळे बाहेर करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवारी दिली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पाच सामन्यांच्या मालिकेपूर्वी गिल, सुंदर व आवेश या तिघांनाही दुखापत झाली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) घरच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘उदय’ झाला आहे. त्यानंतर सूर्याने श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि आता तो कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. ब्रिटिश संघाविरुद्ध सूर्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन खेळाडूंच्या जागी स्थान दिले जाऊ शकते. (IND vs SL Series 2021: आशिष नेहराने श्रीलंका दौऱ्यावरील ‘या’ टीम इंडिया स्टार खेळाडूवर केला कौतुकाचा वर्षाव, विराट-रोहित यांच्याशी केली तुलना)
1. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे या यादीत आघाडीवर आहे. रहाणेने हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे सराव सामन्यात भाग घेतला नव्हता. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक शतक वगळता रहाणेला इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेत व अखेरीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यात देखील स्वतःला सिद्ध करता आले नव्हते. म्हणूनच रहाणेच्या संघातील स्थानावर चिंता व्यक्त केली जात असून त्यालाही प्लेइंग इलेव्हन बाहेर बसावे लागू शकते. यापूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रहाणेला उपकर्णधार असताना देखील संघातून डच्चू देण्यात आला होता.
2. हनुमा विहारी (Hanuma Vihari)
विहारी भारताच्या मधल्या फळीतील एक मुख्य फलंदाज असून सध्या स्थान देखील सध्या धोक्यात आहे. गेल्या काही काळात म्हणावी अशी फलंदाजी विहारीला करता आली नाही. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यातील सुरूवातीचे काही सामने त्याच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. मात्र, या सामन्यांमध्ये देखील त्याची सुमार कामगिरी राहिल्यास त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला खेळवण्यासाठी विचार संघ व्यवस्थापन करू शकते.
3. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
टीम इंडियाचा कसोटी तज्ञ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजारासाठी ब्रिटन दौरा सर्वात महत्वाचा असणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात देखील पुजाराने काही खास खेळी केली नाही. तसेच त्याच्या संथ खेळीवर देखील प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे पुजारा जर सलामीच्या सामन्यात बॅटने अपयशी ठरला तर संघव्यवस्थापन पुजारा ऐवजी सूर्यकुमारला संघात स्थान देऊ शकते.