IND vs AUS 2020-21: टीम इंडियाला जाणवू शकते रोहित शर्माची कमतरता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'हिटमॅन'चे 'हे' धोकादायक आकडे देतात साक्ष
जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियन संघाचा त्यांचाच सामना करेल तेव्हा मर्यादित षटकांच्या मालिकेत 'हिटमॅन' रोहित शर्माची कमतरता त्यांना नक्की जाणवेल आणि त्याच कारणही तसं योग्यच आहे. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली असून हे आकडे त्याची साक्ष देत आहेत.
India Tour of Australia 2020-21: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बहुप्रतीक्षित मालिकेला 27 नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर (Sydney Cricket Ground) दोन्ही संघ पहिल्या वनडे सामन्यात आमने-सामने येतील. रोहित शर्मा (Rohit Sharma) नुकताच भारतीय क्रिकेटचा प्रमुख खेळाडू म्हणून उदयास आला आहे. जेव्हा भारतीय संघ (Indian Team) ऑस्ट्रेलियन संघाचा त्यांचाच सामना करेल तेव्हा मर्यादित षटकांच्या मालिकेत 'हिटमॅन'ची कमतरता त्यांना नक्की जाणवेल. आयपीएल दरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली ज्यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित ओव्हरच्या दौऱ्याला मुकावे लागले आहे. रोहित सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरत पुनर्वसनाची प्रक्रिया करत आहेत. रोहितची अनुपस्थिती संघासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे आणि त्याच कारणही तसं योग्यच आहे. रोहितने ऑस्ट्रेलियामध्ये भारताकडून सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे. (IND vs AUS Series: ऑस्ट्रेलियामध्ये 'या' भारतीय फलंदाजाने सर्वात कमी वयात ठोकले आहे ODI शतक, नाव वाचून बसेल धक्का)
रोहित शर्मा भारतीय संघाच्या मुख्य फलंदाजांपैकी एक आहे. 2013 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये खेळत रोहितने सर्वाधिक धावा केल्या आहेत. या दरम्यान रोहितने कांगारू टीमविरुद्ध त्यांच्याच देशात 5 शतक लगावणारा एकमेव खेळाडू आहे. रोहितने 2016 दौऱ्यावर पर्थ येथे 163 चेंडूत 171 धावांचा डाव खेळला जी भारतीय खेळाडूने केलेली सर्वाधिक धावसंख्या होती. इतकंच नाही तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडेमध्ये दुहेरी शतक करणारा रोहित एकमेव फलंदाज आहे. त्याने बेंगलोरमधील सामन्यात 158 चेंडूत 209 धावांचा डाव खेळला होता ज्यात त्याने 16 चौकार 12 षटकार ठोकले होते. 'हिटमॅन'ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 40 वनडे सामन्यात सर्वाधिक 76 षटकार मारले आहेत. भारतीय सलामी फलंदाजाने 52 डावांमध्ये 64.62 च्या सरासरीने 2,908 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 14 शतके आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत, म्हणजेच त्याने प्रत्येक 2.2 डावांमध्ये पन्नासहुन अधिक धावा केल्या आहेत.
अशा स्थितीत वरील आकडे पाहता रोहित शानदार खेळ करत असल्याचं दिसत आहे आणि यामुळे टीम इंडियाला आगामी मर्यादित ओव्हरच्या मालिकेत त्याची कमतरता नक्की जाणवू शकते. त्यामुळे, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सुरूवाती सामन्यात टीम इंडिया कसे प्रदर्शन करत हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.