ICC World Cup 2019: टीम इंडियाची 'सुपर फॅन' चारुलता पटेल झाल्या सेलिब्रिटी, पेप्सीच्या ऍडमध्ये दाखवणार 'हर घूंट मै स्वैग है'
आता या आज्जी पुन्हा एकदा टीव्ही वर दिसणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारूलता या पेप्सिकोच्या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत.
बांग्लादेश (Bangladesh) संघाला नमवत टीम इंडिया (Team India) ने आयसीसी (ICC) विश्वचषकच्या सेमीफाइनलमध्ये धडक मारली आहे. भारताने आपले 8 पैकी 6 सामने जिंकलेत, तर 1 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 1 एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. बांग्लादेशविरुद्ध सामन्यात टीम आणि चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले ते भारताच्या आज्जीबाईंनी. चारुलता पटेल (Charulata Patel) आज्जी या सामन्यात फुल टू धमाल करताना पाहायला मिळाल्या. त्यांचे फोटोज वैराळ होताच सोशल मीडियावर त्यांची सर्वत्र चर्चा होऊ लागली. मात्र, आता या आज्जी पुन्हा एकदा टीव्ही वर दिसणार आहे. मॅच बांघताना नव्हे तर चक्क एक ऍडमध्ये. (IND vs SL सामन्याआधी लसिथ मलिंगा म्हणतो की यॉर्कर नव्हे तर ही गोष्ट बनवते जसप्रित बुमराह याला सर्वात धोकादायक गोलंदाज)
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चारूलता या पेप्सिको (Pepsi Co) च्या जाहिरातींमध्ये दिसणार आहेत. पेप्सिको विश्वचषकमध्ये #HarGhoontMeinSwagHai या हॅशटॅगसह जाहिरात करत आहेत. पेप्सिकोने इकॉनॉमिक टाइम्स (Economic Times) ला दिलेल्या माहितीनुसार, "चारूलता यांच्यामुळं आम्हाला फायदा होणार आहे. त्यांची कहाणी खुपच छान आणि प्रेरणादायी आहे", असं भाष्य कंपनीच्या प्रवक्त्याने केले आहे.
बांग्लादेशविरुद्ध सामन्यात या आज्जींनी सर्वांची मने जिंकली. भारताच्या खेळाडूंनाही यांना भेटायचा मोह आवरता आला नाही. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि या लढतीतील सामनावीर रोहित शर्मा (Rohit Sharma) यांनी या आज्जीबाईंची भेट घेतल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे, विराटने या आज्जीनं भारताच्या आगामी सामन्यासाठी म्हणजे, श्रीलंका (Sri Lanka) विरुद्ध सामना आणि सेमीफायनल सामन्याचे तिकीट दिले आहेत.