ICC World Cup 2019: तुम्हाला काय करायचंय ते करा, 14 जुलैला माझ्या हातात विश्वकप हवाय, Hardik Pandya चा Video वायरल

भारतानं वर्ल्ड कप जिंकणे हे एकमेव माझे स्वप्न असल्याचे मत हार्दिक पांड्यानं व्यक्त केले आहे.

(Photo Credits: Getty)

आपल्या देशासाठी विश्वकप जिंकून देणे हे कुठल्याही क्रिकटर चे स्वप्न असते आणि असाच काहीसा निर्धार घेऊन भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या हि सध्या इंग्लंड माडे होत असलेल्या विश्वकप मध्ये आला आहे. आयसीसीनं टाकलेल्या एका व्हिडिओमध्ये हार्दिकने आपली विश्वकपमधली एक इच्छा व्यक्त केली. (ICC World Cup 2019: रवींद्र जडेजा का नेहमी विराट कोहली च्या बाजूला बसतो, हार्दिक पंड्या ने उघड केले Team India चे Dressing Room Secrets, Watch Video)

“माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे 14 जुलै रोजी आपल्याला वर्ल्ड कप उचलायचा आहे”, असे सांगितले आहे. पुढे पंड्या सांगतो कि भारतीय संघासाठी खेळणे हा त्याचा श्वास आहे हेच त्याचे सर्वस्व आहे. आपल्या पुढच्या काही आठवड्यांसाठीचा आपला प्लॅनही पंड्या ने सांगितला आणि तो प्लॅन म्हणजे वर्ल्ड कप जिंकणे”.

सध्या हार्दिकची तुलना हि 1983 मध्ये भारताला विश्वकप जिंकून दिलेला कर्णधार कपिल देव शी केली जात आहे. हार्दिक देव सारखाच आक्रमकतेने फलंदाजी आणि गोलंदाजी करतो.

दरम्यान नॉटिंगहॅम मध्ये पावसाची जोरदार बायटिंग सुरु आहे. जर भारत आणि न्यूझीलंडचा सामना झाला नाही तर, दोन्ही संघांना एक-एक गुण देण्यात येतील, मात्र चाहत्यांची पुरती निराशा होणार आहे.