माझी एक आवडती राजकारणी! सुषमा स्वराज यांचे निधन; वीरेंद्र सेहवाग आणि अन्य खेळाडूंनी केले भावनिक Tweet
दुर्दैवी बातम्या ऐकून अनेक माजी क्रिकेटपटू आणि इतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी ट्विट केले.
भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचे दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयात दुःखत निधन झाले. स्वराज यांना हृदयविकाराच्या झटकामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या 67 वर्षांच्या होत्या. स्वराज भारतीय जनता पक्षातील एक धगधगतं व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखल्या जायच्या. आपल्या वक्तृवाने स्वराज यांनी भाजपचा आवाज संसदेत आणि संसदेबाहेर पोहोचवला आहे. जम्मू-काश्मीरला कलम 370 मधून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल तसेच जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे अभिनंदन केले होते. 'मी माझ्या आयुष्यात या दिवसाची प्रतीक्षा करत होती' असे ट्विट करत स्वराज यांनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या. (माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनाच्या अवघ्या तीन तास आधी मानले होते नरेंद्र मोदी यांचे आभार)
दरम्यान, स्वराज यांच्या मृत्यूची बातमी आगीसारखी पसरली असताना, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माजी राजकरणीला श्रद्धांजली वाहिली. दुर्दैवी बातम्या ऐकून अनेक माजी क्रिकेटपटू आणि इतर क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी ट्विट केले.
गौतम गंभीर
वीरेंद्र सेहवाग
व्हीव्हीएस लक्ष्मण
आकाश चोप्रा
हर्षा भोगले
मोहम्मद कैफ
अजित आगरकर
सानिया मिर्झा
मोदी सरकार 1 मध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून काम करताना स्वराज यांनी त्यांच्या कामानं छाप पाडली होती. जगभरातील भारतीयांना त्यांनी तत्परतेने मदत केली. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढवली नाही. याबद्दलची घोषणा त्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात केली होती. प्रकृतीच्या कारणामुले त्यांनी मागील लोकसभा निवडणूक लढवली नाही. याबाबतची घोषणा त्यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात केली होती.