US राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते अहमदाबाद येथे जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन होण्याची शक्यता; जाणून घ्या वैशिष्ट्ये
24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प या भव्य स्टेडियमचे उद्घाटन करतील.
आसन क्षमतेच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (Vallabhbhai Patel Stadium), ज्याला मोटेरा स्टेडियम (Motera Stadium) देखील म्हटले जाते, हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासाठी तयार करण्यात आले आहे. स्टेडियमचे काम समाप्त होण्यात अंतिम काही वेळ राहिले आहे. मोटेरा स्टेडियममध्ये जास्तीत जास्त 1,10,000 प्रेक्षकांसाठी बसण्याची क्षमता असेल. या स्टेडियममध्ये भारत दौऱ्या दरम्यान ट्रम्प आणि मोदी एका सार्वजनिक कार्यक्रमास संबोधित करतील. अहमदाबाद (Ahmedabad) मधील मोटेरा स्टेडियमचे नाव सरदार वल्लभभाई स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे. पूर्वी 53000 प्रेक्षकांची क्षमता असलेले मोटेरा स्टेडियम 2015 मध्ये सध्या देशाचे पंतप्रधान आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रकल्पाचा भाग म्हणून पाडण्यात आले. मागील काही महिन्यांपासून नवीन बनलेले हे स्टेडियम चर्चेत बनले आहे. आणि, जर आता काही अहवालानुसार 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्यावर येणारे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प या भव्य स्टेडियमचे उद्घाटन करतील. (अहमदाबाद विमानतळ ते मोटेरा स्टेडियम दरम्यान स्वागताला 5-7 लाख लोकं असतील: डोनाल्ड ट्रम्प भारत दौर्यासाठी उत्सुक)
वृत्तानुसार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे प्रमुख या स्टेडियममध्ये संयुक्त रॅली घेणार असून लाखो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. हे स्टेडियम तयार करण्यासाठी 100 दशलक्ष यूए डॉलर (तब्बल सात अब्जाहून अधिक रुपये) खर्च करण्यात आले आहे. या स्टेडियममध्ये केवळ क्रिकेट सामनेच होणार नाहीत तर फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, लॉन टेनिस, अॅथलेटिक ट्रॅक, स्क्वॅश, बिलियर्ड्स, बॅडमिंटन आणि पोहणे अशा इतर अनेक खेळांचे आयोजन केले जाणार असल्याचे म्हटले जाणार आहे.
अहमदाबाद येथील मोटेरामध्ये उभारलेले सरदार पटेल स्टेडियम हे विश्वातील सर्वात मोठे स्टेडियम असेल. हे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न स्टेडियमपेक्षाही मोठे असेल. मेलबर्न क्रिकेट मैदानाची एकूण क्षमता 100,024 आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स 66,000 प्रेक्षकांच्या क्षमतेसह दुसर्या क्रमांकावर आहेत.