ICC World Cup 2019: IND vs BAN मॅचदरम्यान एम एस धोनीला चीअर करताना दिसली लेक जिवा, Video व्हायरल
तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जिवा, "पापा ... पापा" म्हणुन धोनीला चीअर कोर्टाने दिसतेय.
आयसीसी (ICC) विश्वकपमधील भारत (India) विरुद्ध बांगलादेश (Bangladesh) मॅच एजबस्टन (Edgbaston) येथे खेळली जात आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास भारतीय संघ सेमीफाइनलमध्ये पोहचेल. त्यामुळे सेमीफायनलच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत भारताने विजयासाठी बांग्लादेशसमोर 315 धावांचे आव्हान दिले आहेत. भारतासाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) ने सर्वाधिक 104 धावा केल्या तर के.एल राहुल (KL Rahul) ने 7, विराट कोहली (Virat Kohli) ने 26 आणि रिषभ पंत (Rishabh Pant) ने 48 धावांचे योगदान दिले. तसेच महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) यांनी 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या मॅचदरम्यान जिवा (Ziva) आपले वडील धोनी ला चीअर करताना दिसली. तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. (ICC World Cup 2019: IND vs BAN सामन्यात रोहित शर्मा याच्या शतकी खेळीनंतर युवराज सिंह याने घेतली केव्हिन पीटरसन याची फिरकी)
जिवाचा हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जिवा, "पापा ... पापा" म्हणुन धोनीला चीअर कोर्टाने दिसतेय. त्यावेळी धोनी आणि दिनेश कार्तिक खेळपट्टीवर फलंदाजी करत होते. पहा हा गोंडस व्हिडिओ:
दरम्यान, भारतासाठी के. एल राहुल आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्यांदा पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली आहे. रोहित सध्या वर्ल्ड कपमध्ये सगळ्यात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, बांग्लादेशसाठी मुस्तफिजुर रहमान (Mustafizur Rahman) ने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याच्या व्यतिरिक्त, शाकिब अल हसन (Shakib Al Hasan), सौम्य सरकार (Soumya Sarkar) और रुबेल हुसैन (Robel Hossain)ने प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. 315 धावांचा पाठलाग करत बांग्लादेशचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. 42 ओव्हरनंतर बांग्लादेशची 6 बाद 238 धावा अशी स्थिती आहे.