Video: हॅमिल्टन पोहचली टीम इंडिया, युजवेंद्र चहल याने प्रवासादरम्यान एमएस धोनी च्या सन्मानार्थ टीम बसमधील 'या' कामाचा केला खुलासा
यजमान न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया ऑकलँडमधून प्रवास करत हॅमिल्टनला पोहचली आहे. ‘चहल टीव्ही’ वर आणखी एक क्षण टिपला गेला चहलने टीम बसमध्ये केएल राहुल, रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहशी संवाद साधला आणि यावेळी त्याने माजी कर्णधार एमएस धोनीबद्दल एक मोठे विधान केले.

यजमान न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) होणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडिया (India) ऑकलँडमधून प्रवास करत हॅमिल्टनला (Hamilton) पोहचली आहे. टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने स्वतःला ट्विटरवर लोकप्रिय ‘चहल टीव्ही’ (Chahal TV) द्वारे खूप प्रसिद्ध केले आहे. सहसा सामन्यांनंतर चहल अनेक भारतीय क्रिकेटपटूंचा मुक्त संभाषणात मुलाखती घेतो ज्यात अनेक आनंददायक क्षण पाहायाला मिळतात. बीसीसीआय टीव्हीवरील या लोकप्रिय टॉक शोमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव, केएल राहुल नियमितपणे सहभागी झाले आहे. ‘चहल टीव्ही’ वर आणखी एक क्षण टिपला गेला चहलने टीम बसमध्ये केएल राहुल, रिषभ पंत, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहशी संवाद साधला आणि यावेळी त्याने माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) बद्दल एक मोठे विधान केले. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी आघाडी कायम राखली असून बुधवारी होणाऱ्या हॅमिल्टनमधील सामना जिंकून मालिका जिंकण्याचा संघ प्रयत्न करेल. (PHOTOS: न्यूझीलंडविरुद्ध ऑकलँड टी-20 सामन्यात कुलदीप यादव कॅमेरामॅन बनलेला बहुल यूजर्सने दिल्या मजेदार प्रतिक्रिया, पाहा Tweets)
टीम इंडियामध्ये धोनीच्या जागी कोण फिट होईल याची चर्चा सुरू आहे, परंतु टीम बसमधील त्याची जागा अद्याप रिक्त ठेवण्यात आली आहे. हॅमिल्टन टी -20 सामन्यापूर्वी बीसीसीआयने चहल टीव्हीचा एक नवीन भाग शेअर केला. संपूर्ण टीम बसमध्ये प्रवास करत होती. या भागादरम्यान चहल म्हणाला की, "अशी एक व्यक्ती आहे ज्याला टीव्हीवर यायचे होते. तो इथे यायला आतुर होता. मी त्याला म्हणालो नाही, धोनी भैय्या, आता नाही, आता वेळ आली नाही.” बसच्या मागील सीटवर बसून चहल म्हणाला की टीम इंडियाला धोनीची खूपच आठवण येते, आणि अजूनही त्यांची बस टीम बसमध्ये जागा रिक्त आहे. आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 सेमीफायनलमधून बाहेर पडल्यापासून धोनी टीम इंडियाच्या बाहेर आहे.
पाहा चहल टीव्हीचा ऑकलंडचा ते हॅमिल्टनचा टीम इंडियाचा प्रवास
टीम इंडिया हॅमिल्टनमध्ये
पहिल्यांदा न्यूझीलंड दौर्यावर आलेल्या बुमराहला चहलने विचारले की तू माझ्याबरोबर डिनरला का जात नाहीस? यावर बुमराह म्हणाला की चहलला त्याच्या वेळेनुसार जेवायच्या वेळेत बदल करावे लागणार. शिवाय, बुमराह म्हणाला की जर त्याने बोलावले तर तो नक्कीच येईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)