युजवेंद्र चहल याने वडिलांसोबत बनवला पहिला टीक-टॉक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हा निर्णय कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी घेण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आदेशाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तसेच येत्या 21 दिवस आम्ही घरातच राहणार असल्याचे अनेकजण बोलत आहेत.

कोरोना विषाणूचा ( Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण भारतात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हा निर्णय कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी घेण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या आदेशाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. तसेच येत्या 21 दिवस आम्ही घरातच राहणार असल्याचे अनेकजण बोलत आहेत. यातच भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) यानी घरात बसून नरेंद्र मोदी यांच्या आदेशाचे पालन केले आहे. दरम्यान, त्याने आपल्या वडिलांसोबत पहिला टीक-टॉक व्हिडिओ (TikTok Video) बनवला आहे. तसेच हा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. युजवेंद्र चहल यांच्या व्हिडिओला अनेकांनी पसंती दाखवली आहे. भारतात कोरोना विषाणूच्या रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.

भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल याने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. चहलने आपल्या वडिलांसोबत पहिला टीक-टॉक व्हिडिओ बनवल्याचे त्याने सांगितले आहे. या व्हिडिओ युजवेंद्र चहल आपल्या वडिलांसोबत मस्ती करत असताना दिसत आहे. या व्हिडिओत चहलच्या वडिलांनी त्याच्याकडे निकालाबाबत विचारणा केली आहे. वडिलांनी विचारलेल्या प्रश्नावर युजवेंद्र चहल म्हणाला की, पप्पा माझ्याकडे एक आनंदाची आणि एक दुख: ची बातमी आहे, त्यापैकी कोणती बातमी तुम्हाला आधी सांगू असे विचारतो. त्यावेळी अगोदर आनंदाची सांग असे त्याचे वडील बोलतात. यावर युजवेंद्र चहल बोलतो की, मी पास झालो. त्यानंतर त्याचे वडील त्याला दुखाची बातमी सांग असे बोलतात. त्यानंतर युजवेंद्र बोलतो की, मी दिलेली पहिली बातमी खोटी आहे. यावर त्याचे वडील त्याच्या मागे धावतात आणि व्हिडिओ समाप्त होतो. हे देखील वाचा- Coronavirus: कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रत्येकांनी डॉक्टर आणि सरकारच्या आदेशांचे पालन करावे; मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांचे नागरिकांना आवाहन

युजवेंद्र चहल याचे ट्विट-

माहितीनुसार, युजवेंद्र चहल यांनी त्याच्या क्रिकेट कारकर्दीत 52 एकदिवसीय सामने खेळले आहे. यात त्याने 91 विकेट घेतले आहेत. दरम्यान त्याने दोनवेळा चार विकेट पटकावले आहेत. तर, दोनवेळा 5 विकेट घेतले आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 42 धावा देऊन 6 विकेट घेऊन सर्वोकृष्ट कामगिरी बजावली आहे.