हार्दिक पंड्या याच्या Engagement पोस्टवर कुलदीप यादव याने केली कमेंट; त्यावर युजवेंद्र चहल ने दिलेल्या मजेदार प्रतिक्रियेमुळे Netizens ने केले ट्रोल
कुलदीप यादव, युजवेंद्र चहलने हार्दिकला साखरपुड्यासाठी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. कुलदीपच्या अभिनंदन करणाऱ्या पोस्टवर चहलच्या मजेदार प्रतिक्रियेवर नेटिझन्सने त्याला ट्रोल करायला सुरु केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने नवीन वर्षाच्या निमित्ताने चाहत्यांना चांगली बातमी दिली आहे. हार्दिकने आपली गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविच (Natasha Stankovic) हिच्यासोबत गुचूप साखरपुडा केला असून दोघे लवकरच लग्न करू शकतात. हार्दिकने सोशल मीडियावर नताशाबरोबर साखरपुड्याची अंगठी दाखविताना त्यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान.' हार्दिकनंतर नताशाने तिच्या इंस्टाग्रामचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात हार्दिक चित्रपटाच्या शैलीने तिला प्रोपोज करताना दिसत आहे. यानंतर टीम इंडियाच्या सदस्यांनी त्यांना या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कर्णधार विराट कोहली पासून कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांनी हार्दिक आणि नताशाला साखरपुड्यासाठी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. हार्दिक आणि नताशाचा गुचूप साखरपुडा संपूर्ण भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांसाठी आश्चर्यकारक बाब होती. (भारतीय संघाचा ऑलराउंडर स्टार हार्दिक पांड्या मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टेनकोविच हिला अनोख्या पद्धतीने प्रपोज करत केली Engagement)
चहलने नवीन जोडप्यास शुभेच्छा दिल्या नंतर त्यांनी कुलदीपने पंड्यासाठी लिहिलेल्या शुभेच्छा पोस्टवर टिप्पणीला प्रत्युत्तर दिले. कुलदीपने अभिनंदन करताना लिहिले "लख लख बढाईयां," यावर चहलने "अब तेरी बारी" असे उत्तर देऊन उत्तर दिले. चहलच्या या मजेदार प्रतिक्रियेवर नेटिझन्सने त्याला ट्रोल करायला सुरु केले आहे.
पाहा चहलच्या पोस्टवर नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:
'आता तू नेक्स्ट'
कोहली, कुलदीप, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज आणि ईशान किशन यांच्यासारखे सहकारी क्रिकेटपटूंनीही हार्दिक आणि नताशाला शुभेच्छा दिल्या. याशिवाय बॉलीवूड आणि टीव्ही कलाकारांनीही पोस्टद्वारे नवीन जोडप्यालाशुभेच्छा दिल्या. हार्दिक सध्या दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय भारतीय संघातून बाहेर आहे. लोअर बॅकवर शस्त्रक्रियेनंतर हार्दिकने सराव सुरू केला असून लवकरच तो टीम इंडियामध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. हार्दिकने नवीन वर्षाच्या निमित्ताने मंगळवारी सर्बियन अभिनेत्री नताशासोबतचा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवरही पोस्ट केला होता, ज्यात त्याने दोघांच्या नात्याची पुष्टी केली होती.