Fantastic 4! लॉकडाउनमध्ये युजवेंद्र चहल ने केला फॅमिली डान्स, 'ढिंच्यॅक पूजासोबत चांगली जोडी बनेल' म्हणत Netizens ने केले ट्रोल
टिकटॉकवर आई-बाबांना नाचवल्यावर चहलने आता फॅमिली डान्स केला आहे. फॅन्सनेही चहलच्या त्या व्हिडिओवर 'बाबा आता बस करं' असं खोचून म्हटलं, तर काहींनी चहल तुझी जोडी ढिंच्यॅक पूजासोबत छान दिसेल असेही म्हटले.
करोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे अनेकांना याचा फटका बसला आहे. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक खेळाडू आपापल्या परीने लोकांना जागरूक करण्याचा आणि घरत राहण्याचा प्रयत्न करत आहे. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्याने क्रिकेटपटूही आपल्या कुटुंबासोबत मिळालेला दुर्मिळ असा वेळ घालवत आहे. या दरम्यान, भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) मात्र सध्या वेगळ्याच विश्वात आहे. क्रिकेट होत नसल्याने मागील काही दिवसांपासून चहल टिकटॉक वर बराच अॅक्टिव्ह झाल्याचे दिसत आहे. लॉकडाऊन दरम्यान, क्रिकेटर व्यायाम करत आहे आणि त्याची फिटनेस टिकवून ठेवतो आहे, दुसरीकडे चहल सतत त्याचे टिकटॉक (TikTok) व्हिडिओ शेअर करत आहे. सोशल मीडियावर त्याचा टिकटॉक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे आणि आता इथंही स्टार बनला आहे. टिकटॉकवर आई-बाबांना नाचवल्यावर चहलने आता फॅमिली डान्स केला आहे. (युजवेंद्र चहल याने वडिलांसोबत बनवला पहिला टीक-टॉक; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे कौटुंबिक नृत्य चांगलेच पसंत केले जात आहे. या व्हिडिओमध्ये चहलशिवाय त्याची आई पापासुद्धा एकत्र डान्स करत आहेत. सर्व कुटुंब काही जाझ संगीताच्या नादात नाचत असून या नृत्य कार्यक्रमात चहल मुख्य भूमिकेत दिसला आहे. फॅन्सनेही चहलच्या त्या व्हिडिओवर ट्रोल केलं. काहींनी त्याला 'बाबा आता बस करं' असं खोचून म्हटलं, तर काहींनी चहल तुझी जोडी ढिंच्यॅक पूजासोबत छान दिसेल असेही म्हटले. पाहा चहलचं कौटुंबिक डान्स:
बाबा प्लिज
घरच्यांना का त्रास देतोय?
हाहाहा
हे थांबवा
मला विष द्या
जास्त होत आहे
ढिंच्यॅक पूजासोबत चांगली जोडी बनेल
चहलने काही दिवसांपूर्वी टिकटॉकवर पदार्पण केले आहे, परंतु अत्यंत कमी वेळात तो तिकिटॉक स्टार बनला आहे. भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाठी नृत्य दिग्दर्शन केल्यानंतर आता लॉकडाऊन दरम्यान चहल आपल्या कुटुंबातील नृत्यदिग्दर्शक म्हणून काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे 29 मार्च रोजी सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) देखील 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.