Coronavirus विरुद्ध युवराज सिंह ने PM-Cares Fund मध्ये केली 50 लाखांची मदत, हरभजन आणि पत्नी गीता ने 5000 कुटुंबात केले रेशन वितरण

युवराज पंतप्रधान केअर्स फंडला 50 लाख रुपयांची मदत करत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी योगदान देणार्‍या भारतातील इतर प्रमुख खेळाडूंमध्ये सामील झाला. त्याचा मित्र हरभजन सिंह यांनी भारतातील कोरोना व्हायरसविरूद्ध पुढाकार घेतला आहे.

युवराज आणि हरभजन सिंह (Photo Credit: Getty)

भारतातील माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) भारताच्या कोविड-19 (COVID-19) विरुद्ध लढात सामील झाला आहे. या व्हायरसमुळे 100 हुन अधिकांचा मृत्यू झाला आहे तर 4000 पेक्षा अधिक संक्रमित झाले आहेत. रविवारी युवराज पंतप्रधान केअर्स फंडला 50 लाख रुपयांची मदत करत कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी योगदान देणार्‍या भारतातील इतर प्रमुख खेळाडूंमध्ये सामील झाला. पाकिस्तानी ज्येष्ठ शाहिद अफरीदीच्या संस्थेला देणगीचे आवाहन केल्यानंतर आतामाजी स्फोटक फलंदाज युवराज आणि त्याचा मित्र हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांनी भारतातील कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) पुढाकार घेतला आहे. तत्पूर्वी, भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनीही रक्कम जाहीर न करता पंतप्रधान-केअर्स फंड आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मदत निधीला पाठिंबा दर्शविला होता. रोहित शर्मासुद्धा या कार्यात सामील झाला. त्याने पीएम-केअर्ससह (PM-Cares) अन्य संघटनांना मदत करून एकूण 80 लाख रुपयांची देणगी दिली. (Coronavirus पासून लढणाऱ्या हिंदू गोलंदाज दानिश कनेरिया ने पाकिस्तानी अल्पसंख्याकांसाठी मागितली युवराज-हरभजन सिंहची मदत)

युवीने प्रधानमंत्री निधीला 50 लाख रुपयांची मदत केली, तर हरभजन आणि त्याची पत्नी गीता बसरा (Geeta Basra) यांनी जालंधरमधील 5,000 कुटुंबांना रेशन पुरवले. युवी आणि हरभजनने ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली. युवराजने लोकांना या कठीण काळात एकजूट राहण्याचे आवाहन केले. युवराजने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, “ऐक्य दाखवण्याच्या दिवशी मी पीएम केअरमध्ये 50 लाख रुपये देण्याचे वचन देतो. कृपया तुमच्या वतीनेही योगदान द्या." दुसरीकडे, भज्जीने लिहिले की, "देवाच्या आशीर्वादाने मी आणि गीताने जालंधरमधील 5,000 हजार कुटुंबांना रेशन देण्याचे वचन दिले आहे. आम्ही पुढेही आपल्या देशवासीयांच्या मदतीसाठी पुढे येत राहू. सुरक्षित रहा आणि सकारात्मक रहा. जय हिंद."

युवीचे ट्विट

भज्जीचे ट्विट

दरम्यान, मागील काही दिवसांपासून युवराज आणि हरभजन यांना सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले आहे. शाहिद अफरीदी फाउंडेशनसाठी त्यांनी मदत मागितली होती, ज्यानंतर भारतीय चाहते संतापले होते. तथापि, दोघांनी नंतर ट्रोलर्सची बोल्ट बंद केली.