युवराज सिंह घेणार क्रिकेट विश्वाचा निरोप?
या परिषदेत युवराज आपल्या क्रिकेट करिअरच्या निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारताला 2011 विश्वचषक (World Cup) सामन्यात विक्रमी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा असलेला युवराज सिंह (Yuvraj singh) आता क्रिकेट विश्वाला कायमचा रामराम करणार असल्याची चर्चा सुरु आहे. आज दुपारी एक वाजता युवराजने मुंबईत बोलावलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत खुलासा होऊ शकतो. युवराजला कर्करोगाचे निदान झाल्यावर त्याच्या फॅन्सवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता मात्र त्यातून चिकाटीने बाहेर येत त्याने अलीकडेच आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या विजयासाठी देखील हातभार लावला होता. पण आता त्याच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा होऊ शकते. युवराजने यापूर्वीच वन डे व टेस्ट मॅचेस मधून ब्रेक घेतला आहे, यंदाच्या आईसीसी क्रिकेट विश्वचषकात (ICC World Cup 2019) देखील त्याचा सहभाग नसल्याने या पत्रकार परिषदेचा नेमका हेतू हा निवृत्ती घोषणा करणे असणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागून आहे.
युवराज सिंह ने आजवर भारतासाठी 40 टेस्ट मॅचेस , 304 ओडीआय मॅच व 58 टी 20 मॅचेस मध्ये दमदार खेळाचे प्रदर्शन केले आहे. इंग्लड विरुद्धच्या वर्ल्ड टी 20 सामन्यात युवराजने सहा बॉल मध्ये सहा षटकार लावल्याचा क्षण आजही क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत ताजा आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि तितकाच दमदार गोलंदाज असणारा अष्टपैलू युवराज हा नेहमीच टीम इंडियासाठी हुकुमाचा एक्का म्हणून सिद्ध झाला होता. Gautam Gambhir या पुढे क्रिकेट खेळणार नाही, केली Retirement ची घोषणी
युवराज सिंग सुपर सिक्स (Watch Video)
दरम्यान युवराज सिंह हा बऱ्याच काळापासून टी 20 लीग मध्ये फ्रीलान्स करिअर करण्याच्या विचाराधीन आहे. मध्यंतरी त्याने याबाबत आईसीसी सोबत चर्चा सुद्धा केली होती. तसेच येत्या काळात GT20 (कॅनडा) व युरो T20 स्लॅम (आयर्लंड आणि हॉलंड) सामन्यात खेळण्यासाठी तो बीसीसीआयशी बोलणी करणार असल्याचे देखील काही सूत्रांतर्फे सांगितले जातेय.