सिक्सर किंग 'युवराज सिंह' याचा क्रिकेट विश्वाला रामराम, जड अंतःकरणाने केली निवृत्तीची घोषणा

टीम इंडियाचा सिक्सर किंग म्हणून ख्यात असलेला युवराज सिंग याने आज क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे.

युवराज सिंह (Photo Credits: ANI)

टीम इंडियाचा (Team India) सिक्सर किंग म्हणून ख्यात असलेला युवराज सिंह (Yuvraj Singh) याने आज क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. मागील काही दिवसांपासून याबाबतच्या चर्चा क्रिकेट प्रेमी आणि युवराजच्या फॅन्समध्ये ऐकू येत होत्या, यासाठी आज खास पत्रकार परिषद बोलावुन त्याने स्वतःच याबाबतचा खुलासा केला आहे.37 वर्षीय युवराजने क्रिकेट निवृत्तीची घोषणा करताना जड अंतःकरणाने आपल्या काही आठवणी देखील फॅन्स व माध्यमांशी शेअर केल्या.

"क्रिकेटच्या पीच वर मी माझ्या आयुष्याची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अठरा  वर्षे जगलो आहे,आजवर अनेकदा माझा पराभव झाला पण मी जिद्द न हारता माझं सर्वस्व क्रिकेटला दिलं आहे. माझ्या वडिलांची इच्छा होती की भारताने विश्वचषक जिंकावं माझ्या सुदैवाने मी त्या विजयाचा एक भाग होतो.  ही माझ्यासाठी एक सुंदर कथा आहे आणि आता तिला पूर्णविराम देऊन तसेच या प्रवासात माझ्यासोबत असणाऱ्या सर्वांचे आभार मानून आता  निरोप घेण्याची वेळ आली आहे". असे म्हणत युवराजने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे.

ANI ट्विट 

युवराज सिंह ने आजवर भारताला मोठे विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली आहे. 2000 मध्ये केनियाच्या विरोधात त्याने वन डे क्रिकेट सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते . यानंतर टी 20 सामन्यात एका ओव्हर मध्ये त्याने सहा षटकार लावून इंग्लंडच्या बॉलर्सची बोलती बंदी केली होती. हा विक्रम करणारा युवराज हा आजवरचा एकमेव खेळाडू आहे. 2011 च्या विश्वचषक सामन्यात देखील कर्करोगाचा सामना करत असताना दमदार बॅटिंग आणि बॉलिंगच्या बळावर त्याने टीम इंडियासाठी विजयी खेळी खेळली होती. मात्र 2012 नंतर युवराज हा आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून लांब होता. यंदाच्या आयपीएल मध्ये त्याने मुंबई इंडियन्स संघात स्थान मिळवले होते मात्र त्यातही जास्त सामने त्याला खेळता आले नाहीत,पण अवघ्या चार सामन्यात देखील त्याने आपली कर्तबगारी सिद्ध केली. Yuvraj Singh याने खरेदी केली सेकंड हँड 'BMW M5' कार, स्पीड आहे जबरदस्त

सूत्रांच्या माहितीनुसार आज निवृत्तीची घोषणा केली असली तरी येत्या काळात युवराज आईसीसीची परवानगी असलेल्या परदेशी टी 20 लीग मध्ये फ्रीलान्स क्रिकेटर म्हणून खेळताना पाहायला मिळू शकतो.याशिवाय युवराज येत्या काळात 'युवी कॅन' या संस्थेच्या मार्फत कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्याचे सामाजिक कार्य देखील करणार असल्याचे त्याने परिषदेत बोलताना सांगितले आहे.