Rinku Singh Salary As BSA Officer: योगी सरकारकडून रिंकू सिंगला शिक्षण विभागात नोकरी, किती मिळणार पगार? वाचा एका क्लिकवर

रिंकू यांची निवड आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंना थेट भरती करण्याच्या 2022 नियमावलीनुसार करण्यात आली आहे. या पदावर त्यांना आकर्षक पगारासह अनेक सरकारी सुविधा दिल्या जाणार आहेत. रिंकू सिंगला जिल्हा बेसिक शिक्षण अधिकारीपद देण्यात आले आहे.

Rinku Singh Salary As BSA Officer: योगी सरकारकडून रिंकू सिंगला शिक्षण विभागात नोकरी, किती मिळणार पगार? वाचा एका क्लिकवर
Rinku Singh (Photo Credit - Twitter)

Rinku Singh Salary As BSA Officer: भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंगची (Rinku Singh) उत्तर प्रदेश सरकारकडून बेसिक शिक्षण अधिकारी (BSA) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत माहिती दिली. रिंकू यांची निवड आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडूंना थेट भरती करण्याच्या 2022 नियमावलीनुसार करण्यात आली आहे. या पदावर त्यांना आकर्षक पगारासह अनेक सरकारी सुविधा दिल्या जाणार आहेत. रिंकू सिंगला जिल्हा बेसिक शिक्षण अधिकारीपद देण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये हे ग्रुप-ए चे राजपत्रित पद असून या पदावर नियुक्त अधिकाऱ्यांना सरकारी निवास दिला जातो. जर सरकारी घर उपलब्ध नसेल, तर त्याऐवजी घरभाडे भत्ता (HRA) दिला जातो.

रिंकू सिंगला किती मिळणार पगार?

बेसिक शिक्षण अधिकारीपद या पदाचा पगार दरमहा 56,100 पासून सुरू होतो आणि अनुभव व वार्षिक वाढीनुसार तो 1,77,500 पर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता आणि इतर भत्तेही मिळतात. सुरुवातीच्या टप्प्यात रिंकू सिंग यांना दरमहा अंदाजे 70,000 ते ₹90,000 पर्यंत पगार मिळू शकतो. (हे देखील वाचा: IND vs ENG 2nd Test 2025: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी संघाची केली घोषणा, जोफ्रा आर्चरची पुनरागमन; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संधी)

देशासाठी खेळून सन्मान मिळवलेला खेळाडू

रिंकू सिंग यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारने देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सरकारी पदांवर संधी देण्यासाठी नवीन धोरण लागू केलं आहे. याच धोरणाअंतर्गत रिंकू यांची BSA पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी जिंकलं सुवर्ण पदक

रिंकू सिंग यांनी 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकलं होतं. 2024 T20 विश्वचषक विजेत्या संघासोबत ते ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह म्हणून सहभागी होते. त्यांनी अनेक सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रिंकू सध्या भारताच्या T20 संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. त्यांनी आत्तापर्यंत भारतासाठी 33 T20 आणि 2 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 08:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).