ENG Announces Squad for IND vs ENG 2nd Test 2025: इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी संघाची केली घोषणा, जोफ्रा आर्चरची पुनरागमन; 'या' 15 खेळाडूंना मिळाली संधी
तडाखेबाज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सुमारे चार वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात परतला आहे. 30 वर्षीय आर्चरने फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता तो पुन्हा एकदा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाची कमान नेहमीप्रमाणे बेन स्टोक्सकडेच देण्यात आली आहे.
India National Cricket Team vs England National Cricket Team: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 2 जुलै (बुधवार) रोजी बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) ने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. तडाखेबाज वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सुमारे चार वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात परतला आहे. 30 वर्षीय आर्चरने फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. आता तो पुन्हा एकदा पांढऱ्या जर्सीत मैदानात उतरण्याची शक्यता आहे. इंग्लंड संघाची कमान नेहमीप्रमाणे बेन स्टोक्सकडेच देण्यात आली आहे.
Jofra's back! 🙌
After making his return to first-class cricket for Sussex, he's back in England's squad for the Edgbaston Test starting next week 🏴 pic.twitter.com/Mr1VYyrCFM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 26, 2025
पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सनी केला पराभव
पहिल्या कसोटीत भारतावर विजय मिळवल्यानंतर इंग्लंडने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. लीड्समध्ये पार पडलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सनी पराभव केला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत दोन्ही संघ विजयी कामगिरीसाठी सज्ज झाले आहेत. दुसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चरच्या पुनरागमनामुळे इंग्लंडचा संघ अधिक बळकट झाला आहे. दुसऱ्या कसोटीत भारताला बरोबरी साधण्यासाठी विजयाची गरज आहे, तर इंग्लंडला आघाडी मजबूत करण्याची संधी आहे.
दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघ: बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, ऑली पोप, जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, ख्रिस वोक्स.
(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2025 06:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

