Southampton Weather Forecast Today: साऊथॅम्प्टनमध्ये आजही पावसाच्या सरी कोसळणार? पाहा काय सांगतोय हवामान खात्याचा अंदाज
भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final 2021) साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जात आहे. या मैदानावर पावसाने हजेरी लावल्यानंतर अखेर शनिवारी हा सामना सुरु झाला.
भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना (World Test Championship Final 2021) साऊथॅम्प्टन (Southampton) येथे खेळला जात आहे. या मैदानावर पावसाने हजेरी लावल्यानंतर अखेर शनिवारी हा सामना सुरु झाला. दरम्यान, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीत भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने 3 विकेट्स गमावून 146 धावा केल्या आहेत. तर, न्यूझीलंडचे गोलंदाज जेमीसन, वॅग्नर आणि बाउल्ट यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली आहे. महत्वाचे म्हणजे, या सामन्यावर सावट असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चिंता सतावत आहे. यामुळे साऊथॅम्पटनमध्ये आज कसे असणार वातावरण, घ्या जाणून.
साऊथॅम्प्टनमध्ये सुरु असलेल्या सामन्यातील तिसऱ्या दिवशीच्या खेळाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार साऊथॅम्प्टनमध्य आज प्रकाश नसून येथील तापमान 19 डिग्री अंश सेल्सिअस असेल. तसेच तुरळक पावसासह ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच 93 टक्के ढगाळ वातावरण असणार आहे. तर, 13 टक्के विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- Father's Day 2021: फादर्स डे निमित्त सचिन तेंडुलकर ने शेअर केली वडीलांची खास आठवण (Watch Video)
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी भारताला बोलावले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या जोडीने भारताला चांगली सुरुवात दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. परंतु, त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. रोहित 34 तर, गिल 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजाराही स्वस्तात माघारी परतला. त्याला केवळ 8 धावा करता आल्या. 88 धावांच्या मोबदल्यात तीन विकेट गमावल्यामुळे भारत अडचणीत सापडला होता. पण कर्णधार विराट कोहलीने 44 धावांची नाबाद खेळी खेळून भारताचा डाव सावरला आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे 29 धावा करून कोहलीला चांगली साथ देत आहे. दिवसाखेर भारताची धावसंख्या 3 विकेट्स गमावून 146 धावा होती.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)