Wrestling Ranking: दीपक पुनिया, 86 किलो गटात No 1 कुस्तीपटू; बजरंग ची 65 किलोमध्ये दुसऱ्या स्थानावर घसरण

जगातील कुश्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता कुस्तीपटू दीपक पुनिया याने आंतरराष्ट्रीय महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत 86 किलोग्रॅम गटात पहिले स्थान मिळवले आहे. तर, बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटात अव्वल स्थान गमावले आणि दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

दीपक पुनिया (Photo Credit: IANS)

जगातील कुश्ती स्पर्धेत रौप्यपदक विजेता कुस्तीपटू दीपक पुनिया (Deepak Punia) याने आंतरराष्ट्रीय महासंघाने (यूडब्ल्यूडब्ल्यू) जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत 86 किलोग्रॅम गटात पहिले स्थान मिळवले आहे. तर, बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने 65 किलो वजनी गटात अव्वल स्थान गमावले आणि दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. दीपकने त्याच्या पहिल्या वरिष्ठ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवले. दीपकने फायनलमध्ये स्थान मिळवले, पण निर्णायक मॅचआधी त्याला दुखापतीमुळे सामन्यातून माघार घ्यावी लागली. यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. फायनलमध्ये दीपकचा सामना इराणचा महान कुस्तीपटू हसन यझदानी याच्याविरूद्ध होता. 20 वर्षीय दीपकचे आता 82 गुण आहेत आणि जागतिक अजिंक्यपद यझदानीपेक्षा तो चार गुणांनी पुढे आहेत. यंदा दीपकने यासर डॉगू येथे रौप्य आणि आशियाई चँपियनशिप आणि सासरी स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. (वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप: राहुल अवारे ने जिंकले कांस्यपदक, स्पर्धेत भारताचे आजवरचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन)

दीपकला त्याच्या चांगल्या खेळाचं फळ मिळालं, पण वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर बजरंग पुनिया दुसर्‍या स्थानावर घसरला आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये बजरंग अव्वल मानांकित कुश्तीपटू म्हणून खेळला होता. 25 वर्षीय बजरंगचे आता 63 गुण आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रशियाच्या गाद्जिमुराद राशिदोवने सुवर्णपदक जिंकले आणि यासह त्याने 65 किलो वजनी गटात पहिले स्थान मिळवले. 57 किग्रा वर्गात विश्व चैम्पियनशिपची कांस्य पदक विजेता रवी दहिया (Ravi Dahiya) याने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. 39 गुणांसह तो पाचव्या क्रमांकावर आहे. तर, कांस्यपदक विजेता राहुल अवारे (Rahul Aware) याच गटात जगातील दुसर्‍या क्रमांकाचा कुस्तीपटू बनला आहे.

दुसरीकडे, महिलांच्या रँकिंगमध्ये मागील आठवड्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे विनेश फोगाट (Vinesh Phogat) ने 53 किलोग्रॅममध्ये चार स्थानांची झेप घेत दुसर्‍या स्थानावर पोहचली आहे. विनेशने विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकण्याशिवाय 2020 टोकियो ऑलिम्पिकसाठीचा कोटा देखील मिळवला. सीमा बिसला 50 किलोमध्ये एक स्थान घसरत तिसर्‍या स्थानावर पोहचली आहे, तर

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now