World Test Championship: ICC कडून टेस्ट चॅम्पिअनशिपचा फॉरमॅट जाहीर; जाणून घ्या Team India कधी आणि कोणाशी भिडणार
यासंदर्भात आयसीसीने अधिकृत माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
क्रिकेट विश्वचषकनंतर आता आयसीसीच्या (ICC) टेस्ट क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात टेस्ट क्रिकेटचा कमी झालेला चाहता वर्ग पाहून आयसीसीने टेस्ट विश्वचषकचे आयोजन केले आहे. दरम्यान आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ (Indian Team) देखील 'आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप' (ICC Test Championship) मध्ये सहभागी होणार आहे. यासंदर्भात आयसीसीने अधिकृत माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे. (इंग्लंड विरुद्ध महिला अॅशेस टी-20 मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीची विक्रमी खेळी; टी-20 मध्ये गाठला 1000 धावा आणि 100 विकेट्सचा पल्ला)
आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिपला 1 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील अॅशेस मालिकेपासून सुरुवात होत आहे. श्रीलंका (Sri Lanka) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यातील 14 ऑगस्टपासून सुरू होणारी दोन टेस्ट सामन्यांची मालिका आणि भारतीय संघाचा वेस्ट इंडिज (West Indies) दौरा देखील या स्पर्धेचा भाग आहे. ही चॅम्पिअनशिप पुढच्या दोन वर्ष म्हणजे 2021पर्यंत चालणार आहे. या दरम्यान 27 मालिकांमध्ये 71 कसोटी सामने होणार आहे. त्यानंतर अव्वल दोन संघांमध्ये जून 2021 मध्ये लंडन (London) येथे टेस्ट जेतेपदाचा सामना खेळवण्यात येईल. दरम्यान, या स्पर्धेचे नियम विश्वचषकमधील नियमांपेक्षा भिन्न आहे.
वनडे आणि टी-20 विश्वचषकच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात वनडे आणि टी-20 विश्वचषक प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि नंबर असणार आहे. खाली पहा टीम इंडियाचे आयसीसी टेस्ट चॅम्पिअनशिप वेळापत्रक:
जुलै-ऑगस्ट 2019: 2 टेस्ट कसोटी विरुद्ध वेस्ट इंडिज (अवे)
ऑक्टोबर-नोव्हेंवर 2019: 3 टेस्ट कसोटी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (होम)
नोव्हेंबर 2019: 2 टेस्ट विरुद्ध बांगलादेश (होम)
फेब्रुवारी 2020: 2 टेस्ट विरुद्ध न्यूझीलंड (अवे)
डिसेंबर 2020: 4 टेस्ट विरुद्ध ऑस्ट्रेलिया (अवे)
जानेवारी-फेब्रुवारी 2021: 5 टेस्ट विरुद्ध इंगंल्ड (होम)