ICC Cricket World Cup 2023 Ticket Price: विश्वचषक 2023 च्या तिकिटांची विक्री सुरु होणार 1 जुलैपासून, येथे जाणून घ्या संपूर्ण तपशील
वर्ल्ड कपचा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेत 10 ठिकाणी 48 सामने खेळवले जाणार आहेत. तर भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
आयसीसी विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर (ICC World Cup 2023 Schedule Announced) करण्यात आले आहे. यावेळी ही स्पर्धा भारताच्या यजमानपदी खेळवली जाणार आहे. जी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्याच वेळी, वर्ल्ड कपचा पहिला आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवला जाईल. त्याचबरोबर या स्पर्धेत 10 ठिकाणी 48 सामने खेळवले जाणार आहेत. तर भारतीय संघ 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. चला तर मग जाणून घेऊया विश्वचषक सामन्यांची तिकिटे कशी खरेदी करायची (World Cup 2023 Tickets). (हे देखील वाचा: Most Sixes in ICC World Cup: विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकणारे पहा 5 खेळाडू, यादीत एकाही भारतीयाचा समावेश नाही)
तिकीट कधी, कुठे आणि कसे मिळणार?
विश्वचषक 2023 चे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर लगेचच चाहते सतत तिकीट शोधत असतात. जेणेकरून पुढे तिकीट बुक करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की विश्वचषक 2023 च्या तिकिटांची विक्री 1 जुलैपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर आयसीसी लवकरच याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांना देणार आहे. आयसीसी त्यांच्या अधिकृत वेबसाइट cricketworldcup.com वर ऑनलाइन तिकिटे विकू शकते. स्थळ आणि सामन्यानुसार तिकिटांची किंमत 100 ते 50,000 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
ICC set to release 2023 World Cup tickets from the 1st week of July. pic.twitter.com/lO0DRMVFSO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 29, 2023
आयसीसीच्या वेबसाइटवर मिळणार ऑनलाइन तिकिट
आयसीसीने तिकीट विक्रीच्या घोषणेसाठी कोणताही दिवस जाहीर केलेला नाही, कारण स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे तिकिटे लवकरच उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे. आयसीसीच्या वेबसाइटवर ऑनलाइन तिकिटे मिळू शकतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अधिकृत तिकीट भागीदार देखील त्यांच्या प्लॅटफॉर्मवर तिकिटे विकू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 29, 2023 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

