IPL Auction 2025 Live

India-Pakistan Cricket Rivalry: 'भारत-पाकिस्तान संघांमध्ये क्रिकेट सामने न होऊ देणं लज्जास्पद', माजी पाक कर्णधार शोएब मलिकने मांडले मत

शोएब म्हणाला की, दोन्ही देशांमधील क्रिकेट पुन्हा सुरू झाले पाहिजे कारण दोन्ही देशांचे चाहते टीममधील स्पर्धा मिस करत आहेत.

भारत-पाकिस्तान क्रिकेट (Photo Credit: Getty)

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट टीममध्ये मागील अनेक वर्षांत अनेक संस्मरणीय सामने पाहायला मिळाले आहेत. दोन्ही देशांत आज राजकीय तणावामुळे 8 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका खेळली गेली नाही आणि दोन्ही टीम फक्त आयसीसी आयोजित स्पर्धेत आमने-सामने येतात. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाकिस्तान मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी, वकार युनूस यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता भारत-पाक क्रिकेटची जगाला गरज आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकने (Shoaib Malik) व्यक्त केले आहे. शोएब म्हणाला की, दोन्ही देशांमधील क्रिकेट पुन्हा सुरू झाले पाहिजे कारण दोन्ही देशांचे चाहते टीममधील स्पर्धा मिस करत आहेत. 2012 मध्ये पाकिस्तानने दोन टी-20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर असताना दोन देशांमध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली गेली होती. (आयसीसी टी-20 विश्वचषक 2020 जिंकण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रबळ दावेदार- शोएब मलिक)

जगाने पाहण्यासाठी दोन्ही देशांनी क्रिकेट स्पर्धा पुन्हा सुरू करावी असा शोएबचा विश्वास आहे. “माझ्या मते जगाला या स्पर्धांची पुन्हा सुरूवात होण्याची गरज आहे, ज्याप्रकारे जागतिक क्रिकेटला अ‍ॅशेसची आवश्यकता आहे,” मलिकने PakPassion.net मला सांगितले. “अ‍ॅशेस मालिकेशिवाय इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटची कल्पना करू शकतात? दोन्ही मालिका एकाच प्रकारच्या उत्कटतेने खेळल्या जातात आणि त्यांचा महान इतिहास आहे, त्यामुळे दोन संघांमध्ये क्रिकेट सामने न होऊ देणं लज्जास्पद ", तो पुढे म्हणाला. “तसेच माझे पाकिस्तानी मित्र आहेत ज्यांना भारतीय क्रिकेटपटूंबद्दल आदर आणि कौतुकास्पद बोलणे आवडते. त्याचप्रमाणे, जेव्हा आम्ही भारतात खेळतो तेव्हा मला आणि माझ्या पाकिस्तानच्या साथीदारांना असे प्रेम आणि पाठिंबा दर्शविला जातो, त्यामुळे मला शक्य होईल तितक्या लवकर परत येणे मला आवडते असे प्रतिस्पर्धी आहे.”

भारताविरुद्ध खेळण्याच्या त्याच्या आवडत्या आठवणी आठवत मलिक म्हणाला, “वैयक्तिक दृष्टीकोनातून, 2009 सेंच्युरियन येथे जेव्हा 128 धावा केल्यावर मी सामनावीर ठरलो आणि 2004 श्रीलंकेमधील आशिया चषक जिथे मी 143 धावा केल्या जिथे मी सचिन तेंडुलकर व युवराज सिंह यांना बाद केले. त्याशिवाय 2004 मध्ये कोलकाता आम्ही 293 धावांचा पाठलाग केला होता आणि तो ही ईदच्या एक दिवस आधी.”