Women's T20I Tri-Series 2020: भारत महिला टीमचा सलग दुसरा पराभव, नताली सिवर च्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 4 विकेटने जिंकला सामना
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेत आज इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. नताली सिवर च्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 4 विकेटने जिंकला सामना आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. इंग्लंडने 3 सामन्यांमध्ये 2 सामने जिंकले, तर भारताला 3 पैकी 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला.
ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या टी-20 तिरंगी मालिकेत आज इंग्लंड (England) विरुद्ध तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाला (Indian Team) पराभवाचा सामना करावा लागला. आज सामना जिंकणे टीम इंडियासाठी महत्वाचे होते, मात्र त्यांनी फलंदाजीने पुन्हा निराश केले. नताली सिवर च्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 4 विकेटने जिंकला सामना आणि गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले. इंग्लंडने 3 सामन्यांमध्ये 2 सामने जिंकले, तर भारताला 3 पैकी 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 123 धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात इंग्लंड महिला संघाने 18.5 ओव्हरमधेच लक्ष्य गाठले. मात्र, गोलंदाजांनी आज चांगली प्रभावी कामगिरी बजावली. दुसरीकडे, फलंदाजांनी पुन्हा निराश केले. टीम इंडियाकडून स्मृती मंधाना (Smriti Mandhana) 45, जेमीमाह रॉड्रिग्ज (Jemimah Rodrigues) 23 आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) ने 14 धावंजे योगदान दिले. दुसरीकडे, आन्या श्रबसोल (Anya Shrubsole) हिने इंग्लंडकडून सर्वाधिक 3, कैथरीन ब्रंट (Katherine Brunt) 2 आणि सोफी एक्लेस्टोनला 1 विकेट मिळाली.
भारताने दिलेल्या 124 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडची सुरुवातही चांगली झाली नाही. राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव ने चांगली सुरुवात करून दिली. राजेश्वरी, राधाने अनुक्रमे अॅमी जोन्स आणि डॅनियल व्याट यांना स्वस्तात माघारी पाठवले. त्यानंतरब्रंटही काही खास करू शकली नाही आणि 8 धावांवर बाद झाली. पण, नंतरसिवरने अर्धशतकी खेळी करत संघाचा विजय निश्चित केला. कर्णधार हीथ नाइट 18, फ्रॅन विल्सन नाबाद 20, टैमी ब्यूमोंटला 3 धावांवर स्मृतीने रनआऊट केले. भारताकडून राजेश्वरीने 3 आणि राधाने 1 विकेट घेतली.
आजच्या सामन्यात भारत महिला संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांची खरी परीक्षा होता. आगामी टी-20 विश्वचषककच्या दृष्टीने ही मालिका महत्वाची मानली जात आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)