Women's T20 World Cup 2020: वेस्ट इंडिजविरुद्ध पराभवानंतर थाईलँड महिला टीमने अशाप्रकारे मानले चाहत्यांचे आभार, जिंकली मनं (VIDEO)

पहिल्यांदा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळणाऱ्या थाईलँड महिला टीमनी शनिवारी डब्ल्यूएसीए, पर्थ येथे वेस्ट इंडीज महिलाविरूद्ध पहिल्या सामन्यानंतर केलेल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्यासमोर वाकून त्यांची मने जिंकली.

थाईलँड महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter: T20WorldCup)

पहिल्यांदा आयसीसी महिला टी-20 विश्वचषक (Women's T20 World Cup) स्पर्धा खेळणाऱ्या थाईलँड महिला टीमने (Thailand Women's Team) शनिवारी डब्ल्यूएसीए, पर्थ येथे वेस्ट इंडीज (West Indies) महिलाविरूद्ध पहिल्या सामन्यानंतर केलेल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी त्यांच्यासमोर वाकून त्यांची मने जिंकली. कर्णधार स्टेफनी टेलरच्या अष्टपैलू खेळाने शनिवारी पहिल्यांदा आयसीसी महिला टी-20 विश्वचषकात खेळणाऱ्या थाईलँडचा पराभव केला आणि स्पर्धेतील 20 चेंडू शिल्लक असताना 7 विकेटने विजय मिळवला. थाईलँड संघाने प्रथम फलंदाजी करताना नऊ विकेट्स गमावून 78 धावा केल्या. फलंदाजीने नसले तरी थाईलँडने वेस्ट इंडिजला चांगली गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करून सहज लक्ष्य गाठू दिले नाही. त्यांनी आपल्या गोलंदाजी आणि भव्य क्षेत्ररक्षणाने सर्वांना प्रभावित केले. या पराभवासह थाईलँड खेळाडू आणि चाहत्यांच्या प्रतिक्रियेने सर्वांचे मन जिंकले. (Women’s T20 World Cup 2020: भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी)

त्यांच्या परंपरेनुसार गटातील ब गटात झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सात विकेटने झालेल्या पराभवा नंतर थाई महिलांनी मोठ्या खेळ भावनेचे प्रदर्शन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ट्विटरवर थाईलँड महिलांच्या अद्भुत हावभावाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

सामन्यात थाईलँड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. थाई टीमला जास्त धावा न करता आल्याने ते संघर्ष करीत राहिल्या. त्यांनी अखेरीस नऊ विकेट गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 78 धावा केल्या. थायलंडकडून नानपाट कोंचारोओनकाइ ने सर्वाधिक 33 धावा केल्या. तिच्याशिवाय नरुमल चेवेईने 13 धावांचे योगदान दिले. अन्य फलंदाज दहाचा आकडाही गाठू शकले नाही. विंडीज कर्णधार स्टेफनी टेलरने तीन ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 3 गडी बाद केले. वेस्ट इंडीजची कर्णधार टेलरला तिच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजीबद्दल 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला. थायलंडने वेस्ट इंडीजच्या आघाडीच्या फलंदाजाला बाद करत 7 व्या ओव्हरपर्यंत 3 बाद 27 धावा अशी स्थिती केली होती. यामध्ये सलामी फलंदाज हेली मॅथ्यूज चीही विकेट समाविष्ट आहे. हेलीने 16 धावा केल्या. यानंतर टेलर आणि शेमाईन कॅम्पबेलने चांगली फलंदाजी करत 16.4 ओव्हरमध्ये आपल्या संघाला लक्ष्यपर्यंत नेले.