Women's T20 Challenge 2020: वेलॉसिटी गोलंदाजांनी सुपरनोव्हासच्या धावगतीला घातली वेसण, मिताली राजच्या टीमसमोर 127 धावांचे लक्ष्य

सुपरनोव्हासने पाहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 126 धावांपर्यंत मजल मारली आणि वेलॉसिटी टीमसमोर विजयासाठी 127 धावांचे आव्हान ठेवले. सुपरनोव्हाससाठी चमारी अटापट्टूने 44, कर्णधार हरमनप्रीतने 33 आणि शशिकला सिरिवर्डेनने 18 धावांचे योगदान दिले.

सुपरनोव्हास आणि वेलॉसिटी (Photo Credit: Twitter/IPL)

Women's T20 Challenge 2020: सुपरनोव्हास (Supernovas) आणि वेलॉसिटी (Velocity) यांच्यात महिला टी-20 चॅलेंजचा पहिला सामना खेळला जात आहे. महिला टी-20 चे सर्व सामने शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) खेळले जात आहे. आजच्या सामन्यात मिताली राजच्या वेलॉसिटीने टॉस जिंकून सुपरनोव्हासला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत सुपरनोव्हासने पाहिले फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 126 धावांपर्यंत मजल मारली आणि वेलॉसिटी टीमसमोर विजयासाठी 127 धावांचे आव्हान ठेवले. सुपरनोव्हाससाठी चमारी अटापट्टूने (Chamari Attapatthu) 44, कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 33 आणि शशिकला सिरिवर्डेनने 18 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, वेलॉसिटीसाठी एकता बिष्टने (Ekta Bisht) सर्वाधिक 3, तर जहानार आलम आणि लेघ कासपेरेक यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वेलॉसिटीने प्रभावी गोलंदाजी आणि फिल्डिंग करत सुपरनोव्हासला मोठी धावसंख्या करू दिली नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोव्हासने मागील दोन हंगामात विजेतेपद जिंकले असून त्यांचे लक्ष्य सलग तिसर्‍या विजेतेपदावर असेल. (SPN vs VEL, Women's T20 Challenge 2020: मिताली राजने जिंकला टॉस; वेलॉसिटीचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय)

आटपट्टू आणि प्रिया पुनिया यांनी डावाची सुरुवात केली, पण 30च्या धावसंख्येवर सुपरनोव्हासला कासपेरेकने पहिला धक्का दिला आणि प्रियाला 11 धावांवर वेदा कृष्णमूर्तीकडे झेलबाद केले. त्यांनतर 7 च्या वैयक्तिक धावसंख्येवर एकता बिष्टने जेमिमाह रॉड्रिग्ज माघारी परतली. त्यांनतर हरमनप्रीत कौर आणि चमारी अटापट्टू यांनी डाव सांभाळला. अटापट्टूचे 6 धावांनी अर्धशतक हुकले आणि ती 44 धावांवर बाद झाली. हरमनप्रीतने संघाला शंभरी पार करून दिली, मात्र भारतीय कर्णधारही 33 धावांवर फटका मारण्याच्या प्रयन्तात झेलबाद झाली. या दोघांच्या बाद झाल्यानंतर सुपरनोव्हासचा डाव अडखळला. तथापि, ससिकला सिरीवर्धनने 21 चेंडूत 18 धावांचा डाव खेळला. पण ती आपल्या संघाला मोठी धावसंख्या गाठून देण्यास अपयशी ठरली. अखेरच्या ओव्हरमध्ये सुपरनोव्हासने नियमित अंतरावर विकेट गमावल्या आणि एकावेळेस 13 ओव्हरमध्ये 110 धावा कर्णधारया सुपरनोव्हासला अखेरीस 126 धावंच करता आल्या.

दरम्यान, यापृवी आजच्या सामन्यात मिताली राजच्या टीमने टॉस जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोविड-19 दरम्यान फेब्रुवारी-मार्च महिन्यात महिला टी-20 वर्ल्ड कपनंतर सर्व आंतरराष्ट्रीय खेळाडू पहिल्यांदा मैदानावर दिसतील. त्यामुळे त्यांची फिटनेस पातळी पाहणे मनोरंजक असणार आहे.