IND vs SL 2nd ODI Live: उजव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यातून युझवेंद्र चहल बाहेर, कुलदीप यादवला मिळाली संधी

दुसऱ्या सामन्यात श्रीलंकाने टाॅस जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs SL 2nd ODI Live: उजव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यातून युझवेंद्र चहल बाहेर, कुलदीप यादवला मिळाली संधी
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल (Photo Credits: Instagram)

IND vs SL 2nd ODI: टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळवला जात आहे. टीम इंडियाने गुवाहाटीमध्ये या मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या दरम्यान, श्रीलंकाने टाॅस जिंकून प्रथम फंलदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या युझवेंद्र चहलच्या जागी भारताने कुलदीप यादवचा समावेश करण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 12, 2023 01:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).