Virat Kohli याच्या नेतृत्वासह ‘या’ 3 खेळाडूंची कारकिर्दीवरही लागणार ब्रेक! Rohit Sharma कदाचितच टी-20 संघात देईल एन्ट्री

टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा सामना आहे. विराटने आपल्या कर्णधारपदाच्या काळात अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली, पण जेव्हा रोहित शर्मा टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेई तेव्हा तो काही खेळाडूंना देखील बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये सेमीफायनल सामन्यासाठी चार संघ निश्चित झाले असताना आज दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत (India) विरुद्ध नामिबिया (Namibia) ग्रुप स्टेजचा अंतिम सामना खेळला जात आहे. टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून ‘रन-मशीन’ विराट कोहलीचा (Virat Kohli) हा शेवटचा सामना आहे. यानंतर विराट केवळ एक खेळाडू म्हणून टीम इंडियाच्या (Team India) टी-20 खेळताना दिसणार आहे. विराटने आपल्या कर्णधारपदाच्या काळात अनेक खेळाडूंची कारकीर्द घडवली, पण जेव्हा रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाच्या नेतृत्वाची धुरा आपल्या हाती घेई तेव्हा तो काही खेळाडूंना देखील बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. आज आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोटी ज्यांचे करिअर रोहितच्या कर्णधार बनल्यानंतर संपुष्टात येऊ शकते. (Indian T20 New Captain: Rohit Sharma बनणार टीम इंडियाचा नवीन कर्णधार? जरा विराट कोहलीचे हे विधान पहा)

1. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)

टीम इंडियाचा स्टार फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल हा कोहलीच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धेसाठी चहलला संघातून वगळण्यात आले होते आणि त्याच्या जागी राहुल चाहरची निवड करण्यात आली. राहुल बऱ्याच वर्षापासून रोहितच्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळताना दिसत आहे. अशा स्थितीत कर्णधार झाल्यानंतर रोहित त्याला संघात निश्चितच संधी देईल. आणि त्यामुळे चहलच्या कारकिर्दीला ब्रेक लागू शकतो. रोहितच्या आवडत्या खेळाडूंना संघात स्थान देणार अ , आगामी काळात राहुलची कारकीर्द निश्चितपणे घडू शकते. राहुल चाहर हा उदयोन्मुख चांगला फिरकी गोलंदाज असून त्याला वारंवार संधी मिळाल्यास संघाला उत्तम गोलंदाज बनू शकतो.

2. वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)

युवा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला देखील आयपीएलमधील खेळीच्या जोरावर टी-20 विश्वचषकसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात आले होते. मात्र या खेळाडूला विश्वचषकात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत रोहितच्या नेतृत्वात त्यालाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असे जवळपास निश्चित दिसत आहे. टी-20 विश्वचषकात पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध महत्त्वाच्या सामन्यांमध्ये वरुणला एकही विकेट घेता आली नाही. त्यामुळे वरूणला आणखी संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.

3. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj)

सिराज देखील विराटच्या खास खेळाडूंपैकी एक आहे. सिराजने टेस्ट क्रिकेटमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएलमधील त्याच्या चांगल्या कामगिरीनंतर टीम इंडियामध्ये येण्याची संधीही मिळाली. मात्र, रोहित कर्णधार झाल्यानंतर हे शक्य करणं खूप कठीण होऊ शकते. मर्यादित क्रिकेटमध्ये सिराजने भरतासाठी बरेच सामने खेळलेले नाहीत आणि पुढेही त्याची निवड होण्यासाठी त्याला प्रभावी खेळ करणे गरजेचे आहे.