Indian Team Playing 11: सुपर-8 साठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की होणार बदल? कोणाला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता घ्या जाणून
टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले. जिथे कोणताही बदल दिसत नव्हता. पण आता सुपर-8 मध्ये काही बदल होणे अपेक्षित आहेत.
T20 World Cup 2024 Super-8: टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (T20 World Cup 2024) टीम इंडियाने (Team India) ग्रुप स्टेजचे सर्व सामने चांगले खेळले. चार सामन्यांपैकी एक सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला. उर्वरित तीन सामने जिंकून भारताने सुपर-8मध्ये स्थान मिळवले. टीम इंडियाचा सुपर-8 मधला पहिला सामना 20 जूनला अफगाणिस्तानसोबत (IND vs AFG) आहे. टीम इंडियाने आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेविरुद्ध त्याच प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरले. जिथे कोणताही बदल दिसत नव्हता. पण आता सुपर-8 मध्ये काही बदल होणे अपेक्षित आहेत. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 WC 2024 Live Streaming Online: सुपर 8 मध्ये भारत-अफगाणिस्तानमध्ये होणार पहिली लढत, जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार विनामूल्य सामना)
संघात होणार बदल
ग्रुप स्टेज मॅचेसमध्ये टीम इंडियाचे फलंदाज आठव्या क्रमांकापर्यंत होते. त्यापैकी चार फलंदाज आणि चार अष्टपैलू होते. उर्वरित तीन वेगवान गोलंदाज होते. पण सुपर-8 साठी टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये काही बदल होऊ शकतात. मोहम्मद सिराजला विश्रांती दिली जाऊ शकते आणि त्याच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे.
सुपर-8 साठी संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
सुपर-8 मधील टीम इंडियाचे सामने
भारत सुपर-8 च्या ग्रुप-1 मध्ये आहे. ज्यामध्ये भारतासोबत अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया आहेत. भारताचा पहिला सामना 20 जून रोजी अफगाणिस्तानशी होणार आहे. यानंतर दुसरा सामना 22 जून रोजी बांगलादेश विरुद्ध आणि भारताचा सुपर-8 मधील शेवटचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे. हा सामना 24 जून रोजी आहे.
हेड टू हेड टी-20 वर्ल्ड कप
भारत विरुद्ध अफगाणिस्तान
टी-20 विश्वचषकात भारत आणि अफगाणिस्तानचे संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. भारताने तिन्ही सामने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध बांगलादेश
टी-20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश चार वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने चारही सामने जिंकले आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
टी-20 विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया पाच वेळा आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. या पाचपैकी तीन सामने भारताने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाने दोन सामने जिंकले आहेत